15 December 2024 12:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Group Shares | टाटा ग्रुपचे हे दोन शेअर्स तेजीत येणार, शेअरची टार्गेट प्राईस पहा, स्टॉकचा तपशील पाहून घ्या

Tata Group Shares

Tata Group Shares | आज शेअर बाजारात सुरुवातीच्या काही तासात बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. मात्र दिवसा अखेर शेअर बाजारात किंचित प्रमाणत सावरला. शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञांनी तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीसाठी काही शेअर्स निवडले आहेत. त्यात सोलार इंडस्ट्रीज आणि टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरचा समावेश आहे.

सोलार इंडस्ट्रीज शेअरची लक्ष्य किंमत :
शेअर बाजारातील तज्ञांनी सोलर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 3900 रुपये निश्चित केली आहे. आणि 3740 रुपयेचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सोलार इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करते.

कंपनी विविध प्रकारचे स्फोटक बनवते. याशिवाय कंपनी क्षेपणास्त्र आणि रॉकेटसाठी वॉरहेड्स बनवण्याचे काम देखील करते. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.014 टक्के वाढीसह 3,801.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टाटा कम्युनिकेशन्स लक्ष किंमत :
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरवर शॉर्ट टर्मसाठी लक्ष किंमत 1260 रुपये निश्चित केली आहे. आणि तज्ञांनी 1215 रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 1,230.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही कंपनी जागतिक दूरसंचार सेवा प्रदाता म्हणून काम करते.

टाटा कम्युनिकेशन कंपनीचा व्यावसायिक दृष्टीकोन मजबूत आहे. फॉर्च्युन 500 मधील 300 कंपन्यांसोबत ही कंपनी व्यवसाय करते. 1600 हून अधिक टेलिकॉम कंपन्यासोबत या कंपनीची भागीदारी आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 7.17 टक्क्यांच्या वाढीसह 4568 कोटी रुपयेवर पोहचली होती. आणि त्यात कंपनीचा निव्वळ नफा 326 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Shares for investment on 22 May 2023

हॅशटॅग्स

Tata Group Shares(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x