
Vascon Share Price | शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या घसरणीसह 73.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मात्र मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत हा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 135 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 रोजी व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 77.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
व्हॅस्कॉन इंजिनीअर कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 2854 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. नुकताच व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 350 कोटी रुपये मूल्याचे पुनर्विकास प्रकल्पाचे काम देखील मिळाले आहे.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1595 कोटी रुपये आहे. 26 मार्च 2020 रोजी व्हॅस्कॉन इंजिनिअर कंपनीचे शेअर्स 7 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 1000 टक्के वाढला आहे.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, त्यांना मुंबईतील प्रकाश को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडने देखील एक ऑर्डर दिली आहे. प्रकाश ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी लिमिटेडने व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला 2.11 लाख चौरस मीटर क्षेत्रावर बांधकाम करण्याचे काम दिले आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 36 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आणि या प्रकल्पातून कंपनीला 350 कोटी रुपये महसूल मिळू शकतो.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीला मिळालेल्या नवीन प्रोजेक्टमध्ये 60 2-3-4 BHK फ्लॅटचे बांधकाम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी 70,000 चौरस फूट व्यावसायिक जागाही दिली जाणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये व्हॅस्काउंटर इंजिनिअर्स कंपनीने उच्च दर्जाचे प्रकल्प वितरित करण्यात चांगला ट्रॅक रेकॉर्ड तयार केला आहे.
या बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनीची स्थापना 1986 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी अॅसेट लाइट मॉडेलनुसार चालते. यासह कंपनी क्लीन रूम पार्टीशन सारख्या उत्पादन व्यवसायात देखील गुंतलेली आहे.
3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.20 रुपये नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉकतब्बल 900 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 5 वर्षांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 रुपयेवरून 75 रुपयेच्या पार गेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.