15 December 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Vikas Lifecare Share Price | शेअरची किंमत 6 रुपये, स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, भविष्यात मोठा फायदा होईल

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सनी अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. आज या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. शनिवारी विकास लाइफकेअर कंपनीने दुबईस्थित स्काय 2.0 क्लबमध्ये A7S विशेष अतिथी म्हणून उपस्थित असण्याबाबत माहिती सेबीला कळवली आहे. ( विकास लाइफकेअर कंपनी अंश )

विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने ‘ब्रेकिंग मी’ या हॉलिवूडच्या हिट चित्रपटामागील स्वीडिश मास्टरमाइंड असलेल्या A7S सोबत या कार्यक्रमाचे आयोजन स्काय 2.0 क्लबमध्ये केले होते. A7S ने Breaking Me, Your Love, Kern Craft 400, Nirvana, Why Do You Lie to Me यासारख्या उत्कृष्ट गाण्यांची निर्मिती केली आहे. आज सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 0.82 टक्के वाढीसह 6.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

A7S ला पूर्वी आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चार वेळा ब्रिटीश अवॉर्ड, बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड 2021, वन लाइव्ह क्रोम अवॉर्ड यासारख्या मोठ्या पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते. जगातील विविध 24 देशांमध्ये ‘ब्रेकिंग मी’ चा टॉप 10 ट्रॅकमध्ये समावेश करण्यात आला आहे. A7S ने जागतिक कलाकारांच्या सहकार्याने विविध देशात म्युझिक कॉन्सर्ट्स आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

मागील महिन्यात जानेवारी 2024 मध्ये विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली होती की, त्यांनी दुबईच्या स्काय 2.0 क्लबमध्ये 79 दशलक्ष डॉलर्स ची गुंतवणूक करून मोठा वाटा खरेदी केला आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले की त्यांनी, शेअर स्वॅप डीलद्वारे स्काय 2.0 क्लबमधील 60 टक्के भाग भांडवल ताब्यात घेतले आहे. या कंपनीने स्काय 2.0 क्लबमधील मेसर्स ब्लू स्काय इव्हेंट हॉल एफझेड एलएलसी दुबई फर्मचे भाग भांडवल धारण केले आहे.

दुबई स्थित स्काय क्लब 2.0 कंपनीचे एंटरप्राइझ मूल्यांकन जवळपास 130 दशलक्ष डॉलर्स आहे. विकास लाइफकेअर लिमिटेड कंपनीने ही अधिग्रहणाची प्रक्रिया चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची योजना आखली आहे. स्काय 2.0 हा मध्य पूर्व तसेच संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा नाइट क्लब म्हणून प्रसिद्ध आहे. स्काय 2.0 हा क्लब दुबई डिझाईन डिस्ट्रिक्टमधील ओपन एअर वेन्यू असलेला असलेला एक शानदार क्लब आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price NSE Live 04 March 2024.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x