12 December 2024 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Vikas Lifecare Share Price | देशाचा विकास फक्त सोशल मीडियावर! पण विकास लाइफकेअर शेअरचा विकास तेजीत, किंमत 4 रुपये

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर स्टॉकमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.

कंपनीचे संचालक मंडळ या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत कंपनीच्या प्रवर्तकांना प्रेफरंस शेअर्स इश्यू करण्याचा निर्णय घेणार आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 6.49 टक्के वाढीसह 4.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

विकास लाइफकेअर कंपनी प्रेफरंस शेअर्स वाटप करून 40 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत कंपनीचे प्रवर्तक विकास गर्ग यांना प्रेफरंस आधारावर सिक्युरिटीज आणि आर्थिक परिवर्तनीय साधने देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. हा प्रेफरंस इश्यू रोख स्वरूपात असून त्याचे मूल्य 40 कोटी रुपये असेल. विकास लाइफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 573 कोटी रुपये आहे. विकास लाइफकेअर कंपनीने जून तिमाहीमध्ये चांगला नफा कमावला आहे.

2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीने 13.31 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला आहे. मात्र कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 25.97 कोटी रुपये लॉस बुक केला होता. विकास लाइफकेअर कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी जून 2023 तिमाहीत विकास लाइफकेअर कंपनीने 2.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाही आधारावर विकास लाइफकेअर कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढीसह 106.31 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 30 August 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x