15 December 2024 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Vinny Overseas Share Price | लॉटरीच लागली! अल्पावधीत या शेअरने 525% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट

Vinny Overseas Share Price

Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना सुखद धक्का दिला आहे. कंपनीने नुकताच संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती, आणि त्यात सर्व सदस्यांनी कंपनीच्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी 2.37 टक्के वाढीसह 192 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 190 कोटी असून कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)

कंपनीची घोषणा :
‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबी फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 13:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 10 इक्विटी शेअर्सवर 13 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. याशिवाय कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवार दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 2.37 टक्के वाढीसह 192 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर ट्रेड करत होते. विनी ओव्हरसीज लिमिटेड कंपनीचा SME स्टॉक 28 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. लिस्टिंग नंतर या कंपनीच्या शेअरची किंमत 525.17 टक्के वाढली आहे. 2023 या नवीन वर्षात शेअरची किंमत 27.37 टक्के वर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vinny Overseas Share Price in focus check details on 17 January 2023.

हॅशटॅग्स

Vinny Overseas Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x