 
						Cumin Jeera commodity Price | भारतीय खाद्य पदार्थात आणि जेवणात जिरे आवर्जून वापरले जाते. डिशची चव वाढवण्यासाठी जिरे खूप प्रभावी ठरते. मात्र मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या सुरुवातीला प्रॉफिट बुकींगमुळे जिऱ्याचे भाग किंचित खाली आले होते.
मात्र आता पुन्हा जिरे बाजारात महाग झाले आहे. नॅशनल कमोडिटी एक्स्चेंजवर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीरा 46,250 रुपये प्रति क्विंटल या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. यापूर्वी जिऱ्याचा उच्चांक 42,440 रुपये प्रति क्विंटल होता.
भाववाढीचे कारण :
कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील हंगामात जिऱ्याच्या उत्पादनात घट होऊ शकते. या भीतीने देशांतर्गत बाजारात जिऱ्याची मागणी वाढली आहे. वाढती मागणी आणि पुरवठ्याच्या अभावी जिऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सीरिया आणि तुर्कस्तानमधून जिऱ्याची अधिक मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही जिऱ्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिरा 51,000 रुपये प्रति क्विंटल किंमत स्पर्श करेल. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या मागणी-पुरवठ्यातील तूटमुळे जिऱ्याची किंमत आणखी वाढेल.
आयआयएफएल सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात चीनमधून जीऱ्याची मोठी डिमांड वाढत आहे. आणि सीरिया आणि तुर्कस्तानमधून याचा कमी पुरवठा झाल्यामुळे सर्वांच्या नजरा भारतावर आहेत. भारत, चीन आणि इतर देशांना जिऱ्याचा मोठा पुरवठादार बनला असून देशांतर्गत बाजारपेठेत मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे भारतात जीरा महाग झाला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		