2 May 2025 9:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

महाराष्ट्रनामा इफेक्ट: मरोळ PTS'मध्ये मुंबई पोलिसांसाठी विशेष कोरोना उपचार केंद्र

Marol PTS, Corona Covid center

मुंबई, १९ मे: राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

दुसरीकडे राज्यात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सर्वसामान्य नागरिकांसह कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा शनिवारी कोरोना विषाणू संसर्गाने मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यातील ३२ वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा कोरोनाने बळी घेतला होता. कोरोनाने मुंबई पोलीस दलातील आठ जणांचा बळी घेतला आहे. मुंबई पोलीस दलातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रनामा न्यूजने त्यासंदर्भात अनेक वृत्त प्रसिद्ध केली होती. त्यात मरोळ येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेली पोलीस प्रशिक्षण केंद्राची सुसज्ज इमारत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आणून तेथे पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्र सुरु केल्यास त्याचा फायदा मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील होईल असं वृत्त दिलं होतं. त्यावर सरकारने देखील प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करत रुग्णालयातून बाहेर परतणाऱ्यां पोलिसांची संख्या वाढत असल्याने उर्वरीत रुग्णही कोरोनामुक्त होतील, असा विश्वास पोलिसांमध्ये आहे.

विशेष म्हणजे मरोळ पोलीस वसाहतीत असलेलं ट्रेनिंग सेंटर पूर्णपने खाली असून तेथे राहण्याची आणि खाण्यापिण्याची पूर्ण सोय देखील इमारतीत आहे आणि मोठ्या प्रमाणावर सौचालाय देखील आहे. या इमारती आसपासचा सुंदर निसर्ग असल्याने कोरोना बाधित पोलीस आणि पोलीस कुटुंबीय यांना मोठा आसरा त्यांच्याच हक्काचा जागेत होणार आहे. आमच्या बातमीप्रमाणे राज्य सरकारने सदर इमारत ताब्यात घेऊन येथे पोलिसांसाठी कोरोना उपचार केंद्र सुरु केलं असून बाजुंच्या इमारतीत विशेष मदत कक्ष देखील स्थापन केला आहे.

 

News English Summary: The training center at Marol police colony is completely down and there is complete accommodation and food in the building as well as a large number of toilets. Due to the beautiful nature around these buildings, the corona-affected police and the police family will have a great refuge in their rightful place. According to our news, the state government took possession of the building and started a corona treatment center for the police

News English Title: Marol PTS building has been converted into Corona treatment center for Mumbai Police News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या