मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता होती. आज सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते.
मात्र मुंबईसह बाहेरील शहरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये येण्यास प्रचंड अडचणी येऊन शकतात हे ध्यानात आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आजचा रंगशारदा येथे आयोजित करण्यात आलेला पदाधिकारी मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेकडून प्रेसनोट काढण्यात आली आहे.
