महत्वाच्या बातम्या
-
#BabyPenguin ट्विटवर ट्रेंड, युवासेनेकडून पोलिसात तक्रार दाखल
ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, थोड्याच वेळात या वेबसाईट्सवर पहा
अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जुलै २०२०, गुरुवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आणि प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती आणि लॉक-अनलॉकच्या गोंधळामुळे गटारीचा सुद्धा निरुत्साह
कोरोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जवळपास सर्वच धर्मांचा सणांवर निर्बंध घातले आहेत. अगदी गणेश विसर्जनासाठी देखील चौपाट्यांची गरज लागणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये पाच ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईद घरीच साजरी करा, मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना आवाहन
राज्यात कोरोनाव्हायरचे नवे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं परवडणारं नाही, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असं आवाहन केलं आहे. च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
देश कोरोना संकटाशी झुंजत आहे आणि भाजप सरकार पाडण्यात व्यस्त, शिवसेनेची टीका
‘देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न - पोलीस, आरोग्य यंत्रणा, सफाई कामगार, सरकार आणि महापालिका टीमवर्क
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या मुंबईतील धारावी परिसरात सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग झोपडपट्टी भागात नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा धोका वर्तवण्यात येत होता. मात्र प्रशासनावर युद्धपातळीने केलेल्या उपाययोजनांमुळे धारावीत कोरोनाला रोखण्यात यश आलं. या कामगिरीचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेनंही केलं.
5 वर्षांपूर्वी -
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम मिश्राला अटक
इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाने जोशुआला बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप स्वराने केला होता. यासंदर्भात तिने काही ट्विट केले असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच शुभम हा गुजरातचा असल्याची शक्यता असल्याने गुजरात पोलिसांनाही त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली होती. “सर इन्स्टाग्राम इनफ्ल्यूएन्सर असणाऱ्या शुभम मिश्रा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अग्रिमा जोशुआला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकली, पवारांची कबुली
सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत दावा केला होता की, सत्ता बनवण्यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती, २०१४ च्या सत्ताकाळातही राष्ट्रवादी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी तशारितीने बोलणी सुरु होती. त्यावर शरद पवार यांनी सामनाच्या मुलाखतीत भाष्य केले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढावं यासाठी जाणीवपूर्वक पावले टाकल्याचं कबूल केले.
5 वर्षांपूर्वी -
ऑपरेशन लोटस याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे सत्तेचा गैरवापर - शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तसंच काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचं धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारलं नाही.
5 वर्षांपूर्वी -
धारावीत RSS च्या स्वयंसेवकांमुळेच कोरोना नियंत्रणात, चित्रा वाघ यांनी फोटो शेअर केले
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकार पाडून दाखवाच, नंतर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करतो
राज्यातील महाविकास आघाडी केव्हाही कोसळू शकते असं सतत विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले की, सरकार पाडणार… सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच.’ ते पुढे म्हणाले की, तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि मुलगी आराध्या कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या चाचण्या घेण्यात आला. या चाचण्यांचा अहवाल आला असून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्याची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे. सुदैवाने जया बच्चन यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची मुलाखत ही तर 'मॅच फिक्सिंग', फडणवीसांचा राऊतांना टोला
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत ही तर ‘मॅच फिक्सिंग’ असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुलाखत संपली की मग मी प्रतिक्रिया देईन असंही फडणवीस म्हणाले आहेत. कोणीही सरकार पाडत नाही आहे, असं सांगणं म्हणजे कांगावा आहे. यामुळे कोरोनाच्या लढाई दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा सणसणीत टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नया है वहं..मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? - देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना औषधांचा काळाबाजार रोखणार, औषध वितरकांचे विभागवार फोन नंबर जाहीर
एका बाजूला कोरोनाचा धुमाकूळ वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्यांची राज्य सरकारनेही आता दखल घेतली असून औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी आता सरकारने थेट औषध वितरकांचेच विभागवार फोन नंबर जाहीर केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हे फोन नंबर जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
RSS स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्याने यश मिळतंय
धारावीत आरएसएसच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग केलं. सगळं श्रेय सरकारने घेण्याचं काही कारण नाही. तर कोरोना विरुद्ध लढाई करताना सरकारने भ्रष्टाचार केला, असं म्हणतं चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राजभवन आणि जलसा सुद्धा सुरक्षित नाही, आता तरी UGC'ला धोका समजला का - उदय सामंत
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राजकारणात कुणी कुणाचा गुरु नसतो, केवळ स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका मांडल्या जातात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये झालेल्या सभेत ‘शरद पवार हे आपले राजकीय गुरू आहे’ असं जाहीर करून टाकलं होतं. त्यानंतर मोदींनी अनेक सभेत याचा दाखलाही दिला. पण, पहिल्यांदाच शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे वक्तव्य खोडून काढले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही; 22 टक्के अपसाईड परतावा मिळेल - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL