महत्वाच्या बातम्या
-
मुंबईने रुग्ण संख्येत चीनमधील वूहानला मागे टाकले
मुंबईमध्ये आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा ५१ हजारावर गेला आहे. तर कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या वुहानमध्ये एकूण ५०,३४० रुग्ण सापडले होते. या आकडेवारीनुसार चीनच्या वुहानला मुंबईने मागे टाकले असून देशातील असे शहर बनले आहे जिथे सुरुवातीपासूनच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. यामुळे आज मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५१,००० वर जाऊन पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनातून बरा झालेल्या रुग्णाला भरमसाट बिल, मनसेकडून सुटका, पोलिसात तक्रार दाखल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने मंगळवारी ९० हजारांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्याने सर्वत्र गर्दी वाढत असताना कोरोनाचा संसर्ग होण्याचा वेग कमी होत नसल्याने एकीकडे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून अनेक खाजगी इस्पितळं रुग्णांवर भरमसाठ बिलं आकारात असल्याचं देखील समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
BMC पाणीपुरवठा विभागामध्ये मुख्य अभियंता शिरीश दीक्षित यांचा कोरोनाने मृत्यू
राज्यात कोरोनाचे एकूण २५५३ नवे रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ वर पोहोचला आहे. तर, आज एकूण १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने ही माहिती दिली. आज दिवसभरात १६६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात सद्या एकूण ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'या' वेळेत खुली राहणार मुंबईतील दुकानं; बीएमसीची सुधारीत नियमावली
मागील अडीच महिन्यापासून लॉकडाउनमुळे ठप्प झालेली मुंबईनगरी लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात हळूहळू पूर्वपदावर येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनंतर अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहे. मुंबईतील लॉकडाउनबाबत पालिकेकडून आणखी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
मजुरांसाठी ट्रेन सोडली सरकारने, 'टाटा' करून श्रेय लाटायला आला, पोलिसांनी रोखलं
काल महाराष्ट्रनामा न्यूजने संपूर्ण सोनू सूद प्रकरणावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील सोनू सूद प्रकरणात बोलताना, राज्य सरकार काही करत नसून केवळ सोनू सूद सर्व मजुरांना मदत करत असल्याची हवा निर्माण केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पोलिसांची प्रचंड मेहनत या प्रकरणात झाकून केवळ सोनू सूदला प्रमोट केल्याचा आरोप सुरु आहे आणि त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्य असल्याचं देखील पोलिसांनी महाराष्ट्रनामा न्यूजच्या टीमला सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
तर तुम्ही देखील सोनू सूद सारखे प्रसिद्ध व्हाल; मनसेचा राऊतांना खोचक टोला
मनसे आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं दिसतंय. सोनू सूद वरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राऊतांना सल्ला दिला आहे. सोनू सूद सारखं प्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला हवं? असं संदीप देशपांडेंनी या व्हिडिओत म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांची खुल्या पत्राद्वारे सेनेवर अप्रत्यक्ष टीका
विरोधकांकडून आता शिवसेनेला लक्ष होऊ लागले. भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला खुलं पत्र लिहित माफी मागितली आहे. ‘आम्हा राजकारण्यांमध्ये आता माणुसकी उरली नाही’, असं म्हणत सोनू सूदच्या कामगिरीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला - संजय राऊत
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या ‘मातोश्री’भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्याला जोरदार टोला लगावला. ‘अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला…मातोश्रीवर पोहोचले’, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्याकडून गरिबाला एका पैशाची मदत नाही, दुसरे करतात त्यांना तरी करु द्या - आ. राम कदम
सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. “महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले.
5 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत
खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांना लुटत असल्याने दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती हे दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारची १०० कोटींची मदत अत्यंत तुटपुंजी - देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगडला १०० कोटींची केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी असून नुकसानग्रस्तांना नुकसानाच्या ७५ टक्के मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार
ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकार म्हणतं बेड्स आहेत, पण सामान्यांना बेड मिळेनात - सविस्तर वृत्त
राज्यात कोरोनाचे २४३६ नवे रुग्ण आढळेल असून एकूण संख्या आत ८० हजार २२९ च्या घरात पोहचली आहे. तसंच राज्यात आज १३९ मृत्यू झाले असून आतापर्यंत एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. शिवाय आज १४७5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंतच्या मृत्यूची नोंद २ हजार ८४९ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या
मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती पण त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला या रुग्णालयात ठेवले होते.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसेना शाखेचे क्लिनिकमध्ये रूपांतर होण्यास सुरुवात
राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य करणं हेच ध्येय
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या कित्येक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या आणि या राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. शिवसेना या पक्षासोबतत आव्हानाच्या प्रसंगात राज्याची धुराही तितक्चाय संयमानं आणि जबाबदारीनं सांभाळणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेची साथ आणि अर्थातच जनतेचं प्रेमही मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी, येथे पासशिवाय प्रवास करता येणार - सविस्तर
कोरोना लॉकडाऊनमध्ये पुनश्च हरीओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ची घोषणा केली. या मिशन बिगीन अगेनबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बीकेसीतील कोविड केअर सेंटरच्या दूरवस्थेवरून मुंबई पालिकेचा खुलासा
निसर्ग चक्रीवदाळासोबतच काल अफवांचंही वादळ उठलं होतं. काल दिवसभरात अनेक अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अफवांचं वादळ शमवता आलं. त्याचप्रमाणे बीकेसी येथे बांधण्यात आलेल्या कोविड केअर्स सेंटर रुग्णालयाचे नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरली होती. मात्र ही माहिती खोटी असल्याचा खुलासा मुंबई महापालिकेने ट्विटरद्वारे केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबईत सखल भागांत पाणी साचायला सुरुवात
काल रत्नागिरी, रायगड आणि पुण्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाने झोडपले. या वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र रायगडकडून वादळाने दिशा बदलली, त्यामुळे मुंबईवरील धोका टळला. परंतु तरीही काल मुंबईत पावसाने वादळी वाऱ्यासह जोर धरला होता. त्यांनतर मुंबईकरांची आजच्या दिवसाची सुरुवातही पावसानेच झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL