15 December 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

SIP Tricks | म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे सूत्र, या सूत्रानुसार गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता

SIP Tricks

SIP Tricks | जर तुम्हाला म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्याची ट्रिक समजली तर तुम्हाला श्रीमंत व्हायला जास्त वेळ लागणार नाही. म्युचुअल फंडमध्ये तुम्ही एका विशेष सूत्रानुसार गुंतवणूक केली तर 30 वर्ष गुंतवणूक करून तुम्ही 10 कोटींपेक्षा मोठा फंड तयार करू शकता. यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडाची काही मूलभूत सूत्रे स्वीकारावी लागतील. चला तर मग या सूत्रांबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पद्धतीने गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक बाजारात कमालीची अस्थिरता असूनही जर तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवत राहिलात, तर तुमच्या म्युच्युअल फंडातील निव्वळ मालमत्ता मूल्य वाढत राहील. अशा प्रकारे दीर्घकाळ गुंतवणूक करून तुम्ही एक मोठा फंड तयार करू शकता.

गुंतवणुकीचे पहिले सूत्र :
म्युचुअल फंड SIP गुंतवणुकीचे पहिले सूत्र 15x15x15 हे आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही पुढील 15 वर्षे दरमहा 15,000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक करत राहिलात, आणि त्यावर तुम्हाला वार्षिक सरासरी 15 टक्के परतावा मिळाला, तर 15 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 1.02 कोटी रुपये चा फंड तयार झाला असेल. म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्हाला करोडपती बनवू शकतो.

गुंतवणुकीचे दुसरे सूत्र :
म्युचुअल फंड SIP मध्ये गुंतवणुक करण्याचे दुसरे सूत्र म्हणजे 15x15x30 हे आहे. या सूत्रानुसार, जर तुम्ही 15 टक्के वार्षिक सरासरी व्याज परताव्याच्या दराने 30 वर्षे दरमहा 15 हजार रुपये जमा करत राहिलात, तर तुम्हाला कालावधी पूर्ण झाल्यावर 10.51 कोटी रुपयांचा परतावा मिळू शकतो. यादरम्यान तुमची गुंतवणूक रक्कम 54 लाख रुपये असेल आणि, त्यावर तुम्हाला 9.97 कोटी रुपये व्याज परतावा मिळेल.

गुंतवणुकीचे तिसरे सूत्र :
म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड SIP मध्ये तुम्ही जेवढी जास्त रक्कम जमा कराल, तेवढा जास्त परतावा तुम्हाला मिळेल. तथापि, तुम्ही तुमच्या आर्थिक त्यांच्या सोयीनुसार ठराविक कालावधीसाठी तुमच्या उत्पन्नानुसार गुंतवणूक करू शकता.

कालावधी नुसार परतावा :
जर तुम्ही तुमच्या वयाच्या 30 व्या वर्षी म्युचुअल फंड SIP गुंतवणूक सुरू केली,तर तुम्हाला किती परतावा मिळेल, याचा हिशेब करू. म्युचुअल फंड SIP गुंतवणूक सुरू करताना तुमचे वय 30 वर्षे आहे असे समजा. जर तुम्ही पुढील 25 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपये SIP पद्धतीने गुंतवणूक केली, आणि सरासरी 12 टक्के व्याज दराने परतावा मिळाला तर, परिपक्वतेच्या वेळी म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्हाला एकूण 84,31,033 रुपये नफा मिळू शकेल.

जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी म्युचुअल फंड SIP मध्ये पैसे जमा करायला सुरुवात केली, तर आणि पुढील 30 वर्ष तुम्ही नियमित गुंतवणूक करत राहिलात तर तुमचा एकूण गुंतवणूक कालावधी 30 वर्ष असेल. मागील 10 वर्षांच्या परतावा आकडेवारीनुसार म्युचुअल फंड SIP च्या माध्यमातून लोकांना सरासरी वर्षिक 15 टक्के व्याज परतावा मिळाला आहे. परंतु जर आपण किंमत 12 टक्के व्याज दराने परतावा मोजला तर, परिपक्वतेच्या वेळी तुम्हाला एकूण 1,52,60,066 रुपये परतावा मिळेल.

टॉप 5 म्युच्युअल फंड आणि परतावा :
* SBI स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 20.04 टक्के
* निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड : 18.14 टक्के
* इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड : 16.54 टक्के
*कोटक इमर्जिंग इक्विटी म्युच्युअल फंड : 15.95 टक्के
* डीएसपी मिडकॅप म्युच्युअल फंड : 15.27 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| SIP Tricks for Investment in Mutual fund SIP for long term to earn huge returns on 02 November 2022.

हॅशटॅग्स

SIP Tricks(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x