15 December 2024 11:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Tata Mutual Fund | टाटा के साथ नो घाटा, टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना वार्षिक 31.50% परतावा देतेय, पैसा वेगाने वाढवा

Tata Mutual Fund

Tata Mutual Fund | टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड या ओपन एंडेड इक्विटी म्युचुअल फंड योजनेने भारतीय पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड’ ला व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टार फर्मने 4 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युचुअल फंडाची स्थापना 31 डिसेंबर 2004 रोजी करण्यात आली होती. डिसेंबर 2022 मध्ये या म्युचुअल फंड योजनेला 18 वर्षे पूर्ण झाली. चला तर मग एकदा या म्युचुअल फंडाच्या SIP रिटर्न्सचा आढावा घेऊ. जाणून घेऊ की 18 वर्षांत 10000 रुपये वर किती परतावा मिळेल? (Tata Mutual Fund Scheme NAV)

टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड परतावा :
जर तुम्ही या योजनेत 10,000 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 1.20 लाख रुपये झाली अस्ती. आणि त्यावर जर तुम्हाला वार्षिक सरासरी 20.72 टक्के परतावा मिळाला असता तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.32 लाखांपर्यंत गेले असते. जर तुम्ही तीन वर्ष 10,000 रुपयेची मासिक SIP केली असती तर तुझी प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 3.60 लाख जमा झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 5.64 लाख रुपये परतावा मिळाला असता. या म्युचुअल फंडाने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 31.50 टक्के परतावा दिला आहे.

जर तुम्ही 5 वर्षासाठी 10,000 रुपये मासिक SIP जमा केली असती तर तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 6 लाख झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 10.15 लाख रुपये परतावा मिळाला असता. मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 21.18 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सात वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणुकदारांना वार्षिक सरासरी 17.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्यानुसार 10,000 रुपयेच्या मासिक SIP ने 8.40 लाख रुपये प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असती, आणि त्यावर 15.44 लाख रुपये परतावा मिळाला असता. जर तुम्ही 10 वर्षापूर्वी या म्युचुअल फंड योजनेत 10,000 ची मासिक SIP गुंतवणूक सुरू केली असती तर, तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 12 लाख रुपये झाली असती आणि त्यावर तुम्हाला 27.18 लाख रुपये परतावा मिळाला असता. मागील दहा वर्षांत या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 15.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सुरूवातीपासून आतपर्यंत परतावा :
जर तुम्ही सुरुवातीपासून आतापर्यंत या म्युचुअल फंड योजनेत 10,000 रुपये मासिक SIP जमा केली असती तर, 21.40 लाख रुपये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली असती, आणि त्यावर तुम्हाला 69.57 लाख परतावा मिळाला असता. सुरुवातीपासून ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत या म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 11.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा म्युच्युअल फंड योजनेची स्थापना 31 डिसेंबर 2004 साली झाली होती.

6 जानेवारी 2023 रोजी टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंडाची NAV डायरेक्ट प्लॅन साठी 106.83 आणि रेगुलर प्लॅनसाठी 100.57 होती. डायरेक्ट प्लॅन पर्यायासाठी या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.40 होते. तर रेग्युलर योजनेचे खर्चाने प्रमाण 2.37 आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप 10 स्टॉक होल्डिंगमध्ये अनेक दिग्गज कंपनीचा समावेश होतो, त्यात, प्रामुख्याने लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, एसीसी, ग्रिंडवेल नॉर्टन, डीएलएफ लिमिटेड, कमिन्स इंडिया, सीमेन्स इंडिया, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि अॅस्ट्रल लिमिटेड, टिमकेन इंडिया या सारख्या कंपनीचा समावेश होतो.

फंडाचा पोर्टफोलिओ
टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड मुख्यतः भांडवली वस्तू, इमारत बांधकाम, उर्जा निर्मिती, बांधकाम साहित्य विक्री, स्थावर मालमत्ता, सेवा आणि सुविधा, तेल वायू आणि उपभोग्य इंधन, ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्टस, वैविध्यपूर्ण आणि वन सामग्रीची टॉप 10 क्षेत्रात गुंतवणूक करते. या म्युचुअल फंडाचे आपल्या बाजार भांडवलानुसार लार्ज कॅपमध्ये 37.43 टक्के गुंतवणूक आहे, तर मिड कॅपमध्ये 41.71 टक्के गुंतवणूक आहे तर स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 20.85 टक्के गुंतवणूक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Infrastructure Mutual Fund Scheme NAV check details on 24 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Mutual Fund(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x