2 May 2024 3:28 AM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-153

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
योग्य पर्याय निवडा. अ)’स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत शौचालय निर्मितीत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. ब)महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात, संपूर्ण हगणदारी मुक्त होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.
प्रश्न
2
डॉ. उषा देशमुख यांनी खालीलपैकी कोणते लेखन केले आहे. अ)ज्ञानेश्वरी एक शोध          ब)कबीर (कवितासंग्रह) क)काव्यदिंडी            ड)अवघी दुमदुमली पंढरी
प्रश्न
3
२१ व्या जागतिक हवामान परिषदेबद्दल खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अ) २१ वी जागतिक हवामान परिषद परीसमधील लुर्बर्जे या शहरात ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०१५ दरम्यान संपन्न झाली. ब) या करारानुसार जागतिक तापमानवाढ १.५ अंशाच्या वर जावू न देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. क)जैविक इंधनाचे युग समाप्त करून अपारंपारिक उर्जेकडे वाटचाल करण्यासाठी जगतील १९५ देशांनी मिळून केलेला हा पहिलाच पर्यावरण करार आहे. ड)हरितवायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी गरीब आणि विकसनशील देशांना २०२० पर्यंत २०० अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
प्रश्न
4
डॉ. उषा देशमुख यांच्यासंबंधी योग्य विधाने निवडा. अ)देशमुख या धार्मिक प्रवचनकार आहेत. ब)देशमुख यांना २०१५-१६ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार घोषित झाला आहे.
प्रश्न
5
१८ ते २२ नोव्हेंबर २०१५ दरम्यान २७ वे आशियन संमेलन (Association of Southeast Asian Nations) ………..येथे पार पडले.
प्रश्न
6
७ ऑक्टोबर २०१५ रोजी मान्यता मिळालेल्या आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारी निरांचल योजना …………शी संबंधित आहे.
प्रश्न
7
WTO च्या सदस्य असलेल्या मंत्रीस्तरीय परिषदेची १० वी बैठक १५ डिसेंबर २०१५ रोजी ………येथे [पार पडली.
प्रश्न
8
खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ)संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहात संगीत मैफल करणारे ए.आर.रहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत. ब)ए.आर.रहमान यांना ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ म्हणून ओळखले जाते.
प्रश्न
9
संयुक्त राष्ट्र संघाने २०१६ वर्ष ………..आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे .
प्रश्न
10
सातव्या वेतन आयोगाबद्दल खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ)सातव्या वेतन आयोग अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला. ब)सातव्या वेतन आयोगाच्या अहवाल २० नोव्हेंबर २०१५ रोजी सादर करण्यात आला . क)या आयोगानुसार मूळ वेतनात १५%, भत्यांमध्ये ६३%, पेन्शनमध्ये २५% वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रश्न
11
९ सप्टेंबर २०१५ रोजी २१ व्या विधी आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली. २१ व्या विधी आयोगाच्या कार्यकाल ………..आहे .
प्रश्न
12
देशाच्या पश्चिम किनारा सुरुक्षित करण्याच्या दृष्टीने …………..आयएनएस सरदार पटेल हा नौदल तळ दि. ९ मे २०१५ रोजी कार्यान्वित करण्यात आला .
प्रश्न
13
ऑक्टोबर २०१५ मध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून देणारे भारतातील एकमेव राज्य ………..
प्रश्न
14
१० डिसेंबर २०१५ रोजी घोषणा करण्यात आलेल्या, देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी भारताला ………..या देश मदत करणार आहे.
प्रश्न
15
एम.एस.सुब्बलक्ष्मी यांच्याविषयी योग्य विधान निवडा. अ)सुब्बलक्ष्मी या कर्नाटकी शैलीतील गायिका होत्या. ब)कर्नाटकी संगीतातील सर्वोत्तम ‘कलानिधी पुरस्कार’ मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. क)भारतरत्न प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला गायिका आहेत.
प्रश्न
16
१५ ते १६ नोव्हेंबर २०१५ दरम्यान जी-२० शिखर संमेलन परिषद ……….. येथे पार पडली.
प्रश्न
17
‘ऐस अगेस्ट ऑड्स (Ace Against Odds) हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले, हे ………..यांचा जीवनावर आधारित आहे .
प्रश्न
18
खालीलपैकी …………या कालावधीसाठी महाराष्ट्रात ‘लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’ राबविले जाणार आहे.
प्रश्न
19
भारत सरकारतर्फे देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार …………यांना मिळाला आहे.
प्रश्न
20
ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या खालीलपैकी योग्य विधान निवडा. अ)मंगेश पाडगावकर यांचा जन्म ११ मार्च १९२९ रोजी झाला. ब)१९५३ -१९५५ या दरम्यान ते साधना सप्ताहीकाचे सहसंचालक होते. क)त्यांना १९८१ चा साहित्य अकादमी पुरस्कार ‘सलाम’ या कवितासंग्रहासाठी देण्यात आला. ड)त्यांना २०१३ चा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.
प्रश्न
21
खालीलपैकी ………हे पुरस्कार एम.एस.सुब्बलक्ष्मी यांना मिळालेला नाही. अ)पद्मभूषण      ब)रेमन मगसेसे पुरस्कार      क)पद्मविभूषण ड)भारतरत्न       इ)पद्मश्री
प्रश्न
22
ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराविषयी योग्य विधाने निवडा. अ)हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो. ब)संतसहित्य व मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. क)पाच लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रश्न
23
संयुक्त राष्ट्र संघ इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युयीनच्या वार्षिक सोसायटी रिपोर्ट २०१५ नुसार माहिती दूरसंचार विकास निर्देशांक मध्ये १६७ देशांमध्ये भारताचा …………..वा क्रमांक आहे.
प्रश्न
24
५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्राच्या मुख्य महालेखापाल (लेखापरीक्षक) म्हणून ………..नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न
25
‘कोशिश’ मोबाईल अॅप बद्दल खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अ)कोशिश या मोबाईल अॅप्लिकेशनचे उद्घाटन नागपूरमध्ये करण्यात आले. ब)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोशिश मोबाईल अॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. क)हे अॅप्लिकेशन नागपूर ग्रामीण पोलीस दलाने सुरु केले. ड)अपघात घडल्यानंतर पोलीस किंवा वैद्यकीय सेवा, नातेवाईक यांना एकाच वेळी माहिती मिळण्यासाठी या अॅपची निर्मिती केली आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x