3 May 2024 12:42 PM
अँप डाउनलोड

तलाठी भरती सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
८३७९६ या संख्येतील  ३ व ९ यांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी केल्यास येणारी संख्या कोणती?
प्रश्न
2
५१, ५०, ४८, ४५, ४१, ३६, ?, ?
प्रश्न
3
१३१ * ९९९९ = ?
प्रश्न
4
५० पेक्षा मोठ्या व ७० पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
5
५ जून या पर्यावरण दिंनानिमित्त इ. १० वि च्या विद्यार्थांना गणित शिक्षकाने एकूण तीनशे रोप देऊन समद्विभूज त्रिकोणाकृती जमिनीवर वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त केले. पहिल्या रांगेत समद्विभूज त्रिकोनाकृतीच्या टोकावर एक रोप लावून प्रत्येक रांगेत संख्या १ ने वाढविण्यास सांगितले. तर त्रिकोणाकृतीचा पाया असलेल्या शेवटच्या रांगेत किती रोपे लावली जातील?
प्रश्न
6
खालील प्रश्नांमध्ये प्रथम संख्याचा गट दिलेला आहे. त्या गटाचे काही वैशिष्ट आहे. ते ओळखून त्या गटात बसू शकणारे पद दिलेल्या पर्यायातून शोधा.२८, ९, ६५, २
प्रश्न
7
सदऱ्याला कोट म्हटले, कोटाला पागोटे म्हटले, पागोट्याला साडी म्हटले, साडीला धोतर म्हटले आणि धोतराला सदरा म्हटले तर डोक्यावर घालण्यासाठी काय वापरायचे?
प्रश्न
8
पायल हिचा जन्म १८ ऑक्टोंबर, १९९३ रोजी झाला. त्यावेळी गांधी जयंती शनिवारी होती. तर पायलचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
प्रश्न
9
एका नावेत सरासरी २२ कि. ग्रॅ. वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि .ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?
प्रश्न
10
एका सांकेतिक भाषेत ‘जननमरण’ हा शब्द जाननामराण असा लिहला जातो, तर त्या लिपीत सकलमंगल हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
11
एका कामावरील मजुरांच्या संख्येत ५५ टक्के वाढ केल्यानंतर एकूण मजुरांची संख्या ९३ झाली. तर प्रभारी मजुरांची संख्या किती होती?
प्रश्न
12
खालील प्रश्नात पाच शब्द दिले आहेत. योग्य तो निकष वापरून या संज्ञांचा क्रम लावल्यास मध्यभागी कोणते पद येईल ते ओळखा.चिरा, रेती, खडक, शिलाखंड , खडा
प्रश्न
13
४५ * ० * १२ = किती?
प्रश्न
14
एका रांगेत ४ मीटर अंतरावर एक मुलगा या प्रमाणे ४० मुलगे उभे केले, तर ४ व २७ क्रमांकाच्या मुलामधील अंतर किती?
प्रश्न
15
एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू १२० मी. आहे. त्या मैदानाभोवती ५ फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल?
प्रश्न
16
रमेशने एका परीक्षेत ८०० पैकी ६४० गुण मिळवले व महेशने ७०० पैकी ५२५ गुण मिळवले. तर दोघांच्या गुणाच्या शेकडेवारीत फरक किती?
प्रश्न
17
एका चालकाने १८० किमी अंतर ताशी ६० किमी वेगाने जाताना व ताशी ४० किमी वेगाने येताना गाडी चालवली, तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती किमी ?
प्रश्न
18
५५५५५ – ५५५५ – ५५५ = ?
प्रश्न
19
७ क्रमवार सम संख्यांची सरासरी १४६ आहे. तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
20
७३१६ ला ४० ने भागले तर येणारी बाकी किती?
प्रश्न
21
एका वर्गातील विद्यार्थांची वयाची सरासरी १२ वर्षे आहे. त्यापैकी २५ विद्यार्थ्याची वयाची सरासरी १० वर्षे आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांची वयाची सरासरी १४ वर्षे आहे. तर वर्गातील एकूण विद्यार्थ्याची संख्या किती?
प्रश्न
22
तीन क्रमवार विषम संख्यांची  बेरीज १४७ आहे तर मधली संख्या कोणती?
प्रश्न
23
खालील दिलेल्या शब्दाशी व्याकरणाच्या दृष्टीने साम्य असलेला शब्द पर्यायातून ओळखा.गर्विष्ठ
प्रश्न
24
दोन संख्यांची लसावि व मसावी अनुक्रमे ६ व ७२ आहे. एका संख्या दुसरीच्या ३/४ पट असेल तर मोठी संख्या कोणती?
प्रश्न
25
रामाचे मासिक उत्पन्न १५, ००० रु. आहे. त्यातील ९, ००० रु. खर्च होतात व उरलेली रक्कम शिल्लक राहते. तर तो मासिक उत्पन्नाच्या शेकडा किती बचत करतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x