3 May 2025 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली | त्यांनीच चोरली-डाका मारला - पटोलेंचा पवारांना टोला

Nana Patole

मुंबई, १० सप्टेंबर | आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो, तसे आजच्या काँग्रेस झाले आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्याच वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती स्वीकारली तर विरोधकांना एकत्र येण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचनाही त्यांनी करून घेतली आहे. शरद पवार एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसेच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली, त्यांनीच चोरली-डाका मारला, नाना पटोलेंचा पवारांना टोला – Congress state president Nana Patole’s reply to Sharad Pawar criticizing the Congress leadership :

विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे सांगतात. यावर विचारले असता पवार म्हणाले, ‘काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात.’ काँग्रेसबाबत विचारले असता त्यांनी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत. त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते.

दरम्यान, पवारांच्या या टोल्याला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या. त्यांनीच जमीन चोरली, डाका टाकला, अशा शब्दात नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांवर हल्ला चढवलाय.

काँग्रेसनं अनेक लोकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल, असा टोला पटोले यांनी लगावला आहे. दुसऱ्या पक्षाबद्दल प्रतिक्रिया द्यायला नको. असं म्हणत पटोले यांनी अप्रत्यक्षपणे पवारांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 2024 ला काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार. कुणाला काय बोलायचं याचं लोकशाहीत स्वातंत्र्य आहे, असंही पटोले बोलताना म्हणाले.

काँग्रेस जमीनदारांचा पक्ष नाही. काँग्रेसनं जमीनदारी केली नाही. काँग्रेसनं ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. सामान्य जनता काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो आम्ही चालू देणार नाही. 2024 मध्ये काँग्रेसच देशाचं नेतृत्व करेल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केलाय. शरद पवार यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली नाही. जमिनदारांचं उदाहरण दिलंय, असंही पटोले म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress state president Nana Patole’s reply to Sharad Pawar criticizing the Congress leadership.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या