मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही वेळातच मुंबई कांदिवली येथे उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती लावणार आहेत. परंतु, उत्तर भारतीयांच्या बाबतीत ते नेमकी कोणती भूमिका मांडतात यावर प्रसार माध्यमं आणि सर्वच प्रमुख पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.

या उत्तर भारतीय महापंचायत समितीने काही दिवसांपूर्वी स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन हे आमंत्रण दिले होते. जर प्रसार माध्यम चुकीची माहिती पसरवत असतील तर राज ठाकरे यांनी स्वतः याविषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती केली होती. त्यामुळे ते आता उत्तर भारतीयांच्या प्रश्नांना थेट उत्तर देणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, उत्तर भारतीय महापंचायत समितीने सुद्धा या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी केल्याचे समजते. यावेळी उत्तर भारतीयांच्यावतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही थेट सवाल विचारले जाणार आहेत आणि राज ठाकरे त्यावर त्यांची तसेच पक्षाची भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान, मराठीत केलेल्या भाषणाचा हिंदी प्रसार माध्यमं चुकीचा अनुवाद लोकांपर्यंत पोहोचवतात आणि ते होऊ नये म्हणून राज ठाकरे आज हिंदीत अनुवाद साधणार आहेत असं वृत्त आहे.

MNS chief raj thackeray will communicate in hindi because of wrong interpretation of marathi in hindi