नागपूर : पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण २५ विधेयक विचारात घेतली गेली. सर्वात महत्वाचं विधेयक हे झोपडपट्टी धारकांना दिलासा देणार होतं. अजूनही पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एकूण साडे बारा लाख कुटुंब मालकीच्या घरापासून वंचित आहेत. आणि त्यासाठीच त्याला गती देण्यासाठी आणि सर्व कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी २ महत्वाची विधेयकं ह्या हिवाळी अधिवेशनात मंजूर सरकार तर्फे मंजूर करून घेण्यात आली असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या घोषणाही या अधिवेशनात करण्यात आल्या असेही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आत्तापर्यंत २३ हजार कोटींच्या अर्जांना मंजुरी दिली आहे. जेवढी मदत भाजप सरकारने केवळ ३ वर्षात केली तेवढी मदत मागील सरकारने १५ वर्षात केलेली मदत यात खूप फरक आहे असेही मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले.
झोटिंग समिती आणि एकनाथ खडसे.
भोसरी जमीन खरेदी आणि एकनाथ खडसे संबंधित नेमलेली झोटिंग समिती आणि त्यांचा अहवाल निरर्थक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		