पुणे : याआधी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचे दाखले देत इतिहास थेट भाषणातून मांडला आहे. परंतु, त्यांनी अजून सुद्धा ती परंपरा कायम ठेवल्याचं काँग्रेसचे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी म्हणाले. पुण्यातील भाषणात मोदींनी भाषणाची सुरुवात करताना ‘पुणे ही लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांची कर्मभूमी असताना, मोदींनी जन्मभूमी असल्याचा उल्लेख केला आणि त्यावरून मोदींचं इतिहासाबद्दलचे अज्ञान पुन्हा जाहीर पणे प्रकट केले आहे,’ अशा शब्दात मोदींवर बोचरी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
तसेच सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यांनी एकेरी उल्लेख केला परंतु नंतर सावरत पुन्हा म्हणाले आणि यावरून ते महापुरुषांचा कसा अपमान करतात हे कडून पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे “पुणे मेट्रो लाइन-३” चे भूमिपूजन पार पडले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाषणादरम्यान या मोठ्या चुका केल्या आणि इतिहासाचं ज्ञान देशाला दाखवलं असा सणसणीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला आहे.
