13 December 2024 1:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Post Office Scheme | केवळ व्याजातून रु.4,49,948 कमाई करा या योनजेतून, मॅच्युरिटी रक्कम रु.14,49,948 मिळेल

Post Office Scheme

Post Office Scheme | गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकार सर्व वर्गांसाठी काही ना काही योजना सादर करत असते. अशाच एका योजनेबद्दल बोलायचे झाले तर पोस्ट ऑफिसकडून ही ऑफर दिली जाते. कोणताही नागरिक या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जोरदार व्याज दिले जाते. तसेच टॅक्स सवलत देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा संपूर्ण तपशील.

ही सरकारी योजना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (पोस्ट ऑफिस टीडी) आहे, जी अल्पबचत योजनेअंतर्गत चालवली जाते. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्ही एकरकमी पैसे गुंतवू शकता, ज्यामध्ये वेळोवेळी व्याज जोडले जाते. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. मुदत ठेवीअंतर्गत चार प्रकारची मुदत दिली जाते.

कोणत्या टर्म साठी किती व्याज?
* पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 1 वर्षाच्या कालावधीसाठी 6.9% व्याज मिळते.
* दोन वर्षांच्या मुदत ठेवकालावधीसाठी 7.0 टक्के व्याज दिले जाते.
* 3 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेवीवर 7.1% व्याज आहे.
* पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांसाठी टाइम डिपॉझिट स्कीम दिली जाते, ज्याअंतर्गत व्याज 7.5% आहे.

जॉईंटमध्ये 3 लोक खाते उघडू शकतात
पोस्ट ऑफिस टीडी अंतर्गत सिंगल आणि जॉईंटमध्ये 3 लोक खाते उघडू शकतात. या योजनेत तुम्ही 100 च्या पटीत कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त रकमेची कोणतीही मर्यादा नाही. पाच वर्षांच्या कार्यकाळात या योजनेत प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपयांची सूट दिली जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही सहा महिन्यांपूर्वी पैसे काढू शकत नाही.

केवळ व्याजातून मिळणार 4.5 लाख
जर तुम्ही या योजनेअंतर्गत दररोज 2,778 रुपयांची बचत केली आणि एका वर्षानंतर कमीत कमी 10 लाख रुपये एकरकमी गुंतवले तर 5 वर्षात तुम्हाला केवळ व्याजातून 4,49,948 रुपये मिळतील. तर, 5 वर्षांतील एकूण रक्कम 14,49,948 रुपये असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office Scheme TD Interest Rates check details 31 July 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x