31 May 2020 3:27 AM
अँप डाउनलोड

तामिळनाडू'नंतर महाराष्ट्रात समूह संसर्गाला सुरुवात; रुग्णाची प्रकृती चिंताजनक

Corona Virus, Pune

मुंबई, २१ मार्च: पुण्यात ४२ वर्षांच्या एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या महिलेवर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेचा परदेश प्रवासाचा काहीच इतिहास नाही. तसंच तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने परदेशात प्रवास केलेला नाही. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारती हॉस्पिटलचे उपवैद्यकीय संचालक जितेंद्र ओसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या महिलेवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तिच्यामध्ये कोरोनाबाबतची काही लक्षणं आढळून आली त्यामुळे त्यांनी तिच्या केली. तर तिला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

तत्पूर्वी तामिळनाडूतील एका २० वर्षांच्या तरूणाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पण हा तरूण परदेशात गेला नव्हता. त्याला कोरोना विषाणूची लागण कशी काय झाली, याचा शोध आरोग्य विभागातील अधिकारी युद्ध पातळीवर घेत आहेत. हा तरूण काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेला होता. तेथून तो रेल्वेने तामिळनाडूला परतला होता. या तरूणाला झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग हे देशातील या आजाराचे समूह संसर्गाचे पहिले उदाहरण असल्याची शक्यताही वर्तविण्यात येऊ लागली आहे.

हा तरूण काही दिवसांपूर्वी रेल्वेने दिल्लीहून तामिळनाडूला आला होता. तिथे त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. हा रुग्ण कोरोना विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला नाही. तो परदेशातूनही आलेला नाही. मग त्याला कोरोनाची बाधा कशी काय झाली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे रोगपरिस्थिती विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर आर गंगाखेडकर म्हणाले, हा रुग्ण परदेशात गेला नव्हता. तरीही त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. आम्ही हा व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आला याची माहिती घेत आहोत. तपासणीचे काम सखोलपणे करावे लागणार आहे. देशात अजून या विषाणूचा समूह संसर्ग (कम्युनिटी ट्रान्समिशन) सुरू झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तामिळनाडूतील प्रकरणात अधिकारी तपास करीत आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

 

News English Summery:  A 42-year-old woman has been infected with Corona virus in Pune. The woman is undergoing treatment at a private hospital in Pune. Her condition is worrisome and she has been put on a ventilator. This information was provided by ANI news agency. Notably, a woman infected with the Corona virus has no history of travel abroad. Also, none of her family members have traveled abroad. The ANI has reported in this regard. According to Jitendra Oswal, deputy medical director of Bharati Hospital, the woman who was infected with Corona was initially taken to a local hospital. The doctor who treated her found some symptoms of coronas in her, so they did so. So it turned out that she was infected with the corona virus. Currently her condition is worrisome and she has been put on a ventilator.

 

News English Title:  Story one woman infected Corona virus in Pune she does not have travel history News Latest Updates.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x