कोरोना काळजी! मुंबईकरांचं दुर्लक्ष, समूहात मॉर्निंग वॉक आणि सूट्टीतलं क्रिकेट सुरूच
मुंबई, २१ मार्च: देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात आज २१ मार्च रोजी एकूण रुग्णांची संख्या ही ६३ वर पोहोचली आहे. शुक्रवारीही संख्या ५२ वर होती. त्यामुळे गेल्या २४ तासांत ११ नवीन रुग्ण आढळून आल्याची बाबसमोर आली आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरवत आहे. आतापर्यंत भारतात जवळपास २५० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृह आणि गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक शहरं पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.
कोरोना व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाही. जगभरातील देश यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या तरी या व्हायरसच्या संपर्कात येवू नये इतकंच करता येवू शकतं. भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातच याचा नाश करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात हा पोहोचला तर याला थांबवणं कठीण होणार आहे.
मात्र मुंबईकर अनेक ठिकाणी सरकारच्या सूचनांना पायदळी तुडवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी पार्क मैदानाभोवती देखील मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकं सकाळी मॉर्निंग वॉक करताना दिसले तर सुट्टीच्या बहाण्याने कंपनीतील मित्र मंडळी क्रिकेटचा आनंद लुटणं दिसत आहेत. त्यामुळे लोकांना या भीषण आपत्तीबद्दल किती गांभीर्य आहे याचा प्रत्यय येतो. त्यामुळे सरकारने आता धाडसी निर्णय घेऊन कोरोना राज्यात तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्यापासून रोखणं गरजेचं आहे असंच मत व्यक्त होताना दिसत आहे.
Maharashtra: People walked, did physical exercise & played cricket at Chhatrapati Shivaji Maharaj Park in Mumbai today morning even as Prime Minister Narendra Modi & Chief Minister Uddhav Thackeray have appealed to people to avoid gathering at public places. #CoronavirusPandemic pic.twitter.com/Tbpd0dDo8b
— ANI (@ANI) March 21, 2020
News English Summery: According to a PTI news release, the total number of patients has reached 63 on March 21 in Maharashtra. Friday was also at 52. Therefore, in the last 24 hours, 11 new patients have been reported. In India too, the corona virus is spreading slowly. So far, around 250 people have been reported to have coronary infection in India. In many cities of India, malls, cinemas and crowded places have been closed to prevent this epidemic. Many cities will be closed for the next few days. However, in many places, it is seen that the suggestions of the government are being disobeyed. Even around the famous Chhatrapati Shivaji Park grounds in Mumbai, a large number of locals were seen doing Morning Walk in the morning while the friends of the company were seen enjoying the cricket with holiday excuses. So people realize how serious this disaster is. Therefore, it seems that the government is taking bold decisions and preventing them from reaching the third stage in the state of Corona.
News English Title: Story even after state government instructions Mumbaikars never following request News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News