छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचं माझं कॉलेजमध्ये असल्यापासूनचं स्वप्न: राज ठाकरे
ठाणे : एका मराठी दैनिकाच्या वतीने ठाण्यामध्ये ‘कलासंगम २०२०’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकट मुलाखतीने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. जेष्ठ पत्रकार अंबरीष मिश्र ही मुलाखत घेत आहेत. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी राजकारणावर चौफेर फटकेबाजी केली.
“कॉलेजमध्ये असल्यापासूनचं माझं पहिलं प्रेम आहे हे चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन हेच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट करावा असा विचार मी कॉलेजमध्ये असताना केला होता,” असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. तसंच महाराजांचा इतिहास फक्त तीन तासात दाखवणं हे देखील तितकंच अशक्य आहे, कारण महाराजांचा इतिहासच तेवढा मोठा आहे की तो आपण आजवर बघत आलेल्या चित्रपटांच्या पलीकडे कितीतरी विशाल असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं.
या मुलाखतीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. इतिहासातील छत्रपती शिवाजी महारांजाच्या मंत्रिमंडळाचा दाखला देताना त्यांनी देशमुख, सरदेशमुख या महाराजांच्या मंत्रिमंडळातील काही पदांचा उल्लेख केला. यावेळी मुलाखतकारांनी त्यांना फडणवीस हे पदही होते, असे सांगितले. यावर प्रतिउत्तर देताना महाराजांच्या नंतरच्या काळात फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
राजकारणातील कोणत्या नेत्यांचा चेहरा व्यंगचित्रासाठी परफेक्ट आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चेहरा देखील व्यंगचित्र काढण्यासाठी योग्य असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा चेहरा चांगला नसल्याचे सांगत राहुल गांधींचे वडील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा चेहरा चांगला होता असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
News English Summery: “My first love since being in college was filmmaking, film directing. I had planned to do a film on Chhatrapati Shivaji Maharaj while in college, ”Raj Thackeray, president of Maharashtra Navnirman Sena, revealed in an interview. Speaking at an event organized in Thane, Raj talked about the idea of making a film about Chhatrapati Shivaji Maharaj and why he left behind while illuminating the memories of his college days. Raj Thackeray was interviewed at an event organized at Gadkari Rangayatan in Thane. Interviewer Ambarish Mishra made an attempt to highlight an artist in Raj Thackeray.
New English Title: Stories MNS Chief Raj Thackeray says wanted to make film on Chatrapati Shivaji Maharaj.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या