3 May 2024 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट
x

एनसीपीचा राजीनामा देऊन तारिक अन्वर पुन्हा काँग्रेसवासी

नवी दिल्ली : शरद पवारांचे जुने विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे तारिक अन्वर अखेर यांनी आज राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवापसी केली आहे. त्यामुळे बिहारमधील राष्ट्रवादीची ताकद संपुष्टात आली आहे. तारिक अन्वर हे दिल्लीतील राजकारणातले मोठे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू म्हणून सर्वश्रुत होते. त्यामुळे काँग्रीसला बिहारच्या राजकारणात बळ मिळणार आहे.

तारिक अन्वर हे एनसीपी पक्षाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे नेते होते. काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यात तारिक अन्वर यांची महत्वाची भूमिका होती. मागील काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवर काहीसे नाराज होत आणि परिणामी त्यांनी राजीनामा दिला होता. त्याला मूळ कारण राफेल डील प्रकरणात शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली होती आणि ते पवारांच्या त्या भूमिकेवर प्रचंड नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी राफेल खरेदी संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात पवारांनी मोदींना एकप्रकारे अप्रत्यक्ष क्लीन चिट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी पक्ष आणि खासदारकीचा राजीनामा देत आहे असं म्हटलं होत. आज अखेर त्यांनी घरवापसी करत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x