29 April 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार? Smart Investment | स्मार्ट इन्व्हेस्टमेंट! दर महिन्याला 5-10-15 हजार रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता HDFC Mutual Fund | सुवर्ण संधी! HDFC म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा
x

मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला सुरवात.

आंगणेवाडी, मालवण : मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या प्रसिध्द जत्रेला आजपासून सुरवात झाली. ही जत्रा दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिध्द आहे. मसुरे आंगणे मंडळ आणि स्थानिक शासकीय यंत्रणांकडून या यात्रेची संपूर्ण तयारी झाली आहे. सकाळी पहाटेपासून भाविक दर्शनाला सुरुवात करतील.

भावीक भराडी देवीचे केवळ अर्ध्या तासात दर्शन घेऊ शकतील असे व्येवस्थापन आंगणे मंडळ म्हणजे देवस्थान मंडळाने केले आहे. प्रसिध्द करण्यात माहिती नुसार भाविकांसाठी एकूण नऊ रांगांची व्यवस्था देवस्थान मंडळाने केली असून यावर्षी कमीत कमी आठ लाख भाविक दर्शनासाठी उपस्थिती लावतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मसुऱ्याची आंगणेवाडी अगदी भक्तिमय झाली असून, संपूर्ण गाव रोषणाईने उजळून निघाले  आहे. जत्रे दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये कृषी प्रदर्शन, फ्लावर शो आणि सिंधु सरस महोत्सव यांचा समावेश आहे.

यंदा शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्या आल्याने यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता व्यक्तं केली जात आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x