7 May 2025 2:59 PM
अँप डाउनलोड

माझं गोत्र 'कौल दत्तात्रय ब्राह्मण' सांगत राहुल गांधींचे भाजपला प्रतिउत्तर

अजमेर : सध्या ५ राज्यांमध्ये विधानसभेची धामधूम सुरु असून त्यानिमित्त एकमेकांवर चिखलफ़ेक सुरु असताना भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना डिवचण्यासाठी तुमचे गोत्र कोणते असा प्रश्न उपस्थित केला होता. सध्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजस्थान दौऱ्यावर आले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अजमेर येथे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाहामध्ये येथे चादर चढवली. त्यानंतर ते थेट पुष्कर येथील जगतपिता ब्रम्हाच्या मंदिरात गेले. त्यावेळी त्यांनी स्वतः त्यांच्या गोत्राचा जाहीररीत्या खुलासा केला. पुष्कर दर्शनावेळी मंदिरातील पुजाऱ्याने राहुल गांधी यांना तुमचे गोत्र सांगा असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ‘कौल दत्तात्रय ब्राह्मण’ असे उत्तर दिले. राहुल गांधींनी ते कौल (कश्मीरी) ब्राह्मण असून त्यांचे गोत्र दत्तात्रय असल्याचे स्पष्ट केले आहे सांगितले. आणि त्यानंतरच त्यांनी मंदिरात पूजा पूर्ण केल्याचे पुजारीने प्रसार माध्यमांना सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या