7 May 2025 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

बहुचर्चित 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लाँच

मुंबई : स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर आज उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लॉंच करण्यात आला. वडाळ्यातील आयनॉक्स थिएटरमध्ये हा ट्रेलर लाँच करण्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटातील ट्रेलरमध्ये दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांची सुद्धा व्यक्तीरेखा दिसल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.

स्वर्गीय. बाळासाहेबांवरील चित्रपट साकारणं ही अत्यंत कठीण जवाबदारी असून हा चित्रपट नसून शिवधनुष्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते निर्माते संजय राऊत, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव आदी मंडळी आजच्या भव्य कार्यक्रमाला उपस्थित होती. सदर सिनेमामध्ये शिवसेनेची स्थापना, मराठीसाठीचे आंदोलन, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेली दंगल आदी विविध मुद्यांची झलक नजरेस पडली.

काय आहे हा नेमका सिनेमाचा ट्रेलर?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या