7 May 2025 2:44 PM
अँप डाउनलोड

त्या स्वातंत्रवीराची अनास्थाच? वीर सावरकर केवळ स्वतःच्या फोटोशूटसाठी?

मुंबई : काल प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि नामवंत संगीतकार भूपेन हजारिका यांची या वर्षीच्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यापैकी नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. परंतु, असं असलं काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान-निकोबारला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना काळ्यापाण्याची सजा देताना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते, त्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन मोठ्या प्रमाणावर फोटोशूट केले होते.

दरम्यान मोदींच्या त्याच अंदमान निकोबार दौऱ्यातील फोटोशूटचा भाजपने समाज माध्यमांवरून मोठा प्रचार केला होता. त्यानंतर वीर सावरकरांच्या योगदानाला काँग्रेसने नव्हे तर मोदींनी न्याय दिला असा प्रचार सुरु केला होता. परंतु, एखाद्याच्या कर्तृत्वाचा गौरव त्या संबंधित ठिकाणाला केवळ भेट देऊन होत नसतो याचे भान विद्यमान सरकारला राहिलेले नाही.

स्वातंत्रवीर असे ज्यांची ओळख आहे त्याचा भारतरत्न देण्यासाठी विचारसुद्धा झाला नाही ही खेदाची गोष्ट आहे. परंतु, अंदमान निकोबार दौऱ्यातील विविध अँगलमधून फोटोशूट करून त्याचा प्रचार करणे आणि त्यांच्या योगदानाला न्याय दिल्याच्या बाता मारणे ही सर्वाधिक खेदाची बाब आहे. कदाचित लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नाहीत हे त्या मागील मुख्य कारण असावं, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

आज भारतरत्न पुरस्कार न दिल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विनायका प्राण तळमळला असे लिहून भारतरत्न पुरस्काराचे चिन्ह संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या