3 June 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 03 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Railway Ticket Booking | ट्रेन सुरू होण्याच्या 10 मिनिटे आधी मिळवा कन्फर्म सीट, बुकिंग वेळी 'या' ट्रिक फॉलो करा Honda Elevate Price | खुशखबर! लोकप्रिय होंडा एलिव्हेट SUV वर बंपर डिस्काउंट, स्वस्तात खरेदीची मोठी संधी IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल LIC Mutual Fund | बिनधास्त SIP करा सरकारी म्युच्युअल फंडाच्या या योजनेत, फक्त व्याजातून 79 लाख रुपये मिळतील Suzlon Share Price | स्वस्त स्टॉक अप्पर सर्किट हीट करतोय, ऑर्डरबुक मजबूत झाली, पुढील टार्गेट प्राईस नोट करा
x

Multibagger Stocks | या शेअरचे गुंतवणूकदार श्रीमंत झाले, खरेदीनंतर सय्यम ठेवला, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 28 कोटीचा परतावा मिळाला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आयशर मोटर्स लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 23.81 टक्के भरघोस परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, 2022 या एका वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 27.74 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

आयशर मोटर्स लिमिटेड – Eicher Motors Share price :
रॉयल एनफिल्ड ही लोकप्रिय मोटर सायकल बनवणारी मूळ कंपनी आयशर मोटर्स लिमिटेडच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. आता पुन्हा एकदा कंपनीचे शेअर्स नवनवीन रेकॉर्डस् तोडताना दिसत आहेत. उत्कृष्ट परतावा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास यामुळे वाहन क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या शेअर्सची मार्केटमध्ये जबरदस्त मागणी आहे. मगील ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअरने तब्बल 1.38 टक्क्यांची उसळी घेतली आणि प्रती शेअर किँमत 3473 रुपयांवर जाऊन बंद झाली होती. कंपनी पुढील काळात 3513.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत ओलांडू शकते. कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3153.70 रुपये आहे. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की हा स्टॉक आता ओव्हरव्हॅल्युड झाला आहे का? चला तर मग जाणून घेऊ.

तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजला विश्वास आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या 12 महिन्यांत 4170 रुपयांच्या पातळीवर जातील. जर कंपनी ह्या उच्चांकी किमतीवर जाऊन पोहोचली तर हा स्टॉक, शेअर बाजारात एक नवा विक्रम प्रस्थापित करेल. शेअर बाजार तज्ञ म्हणतात की, ‘आयशर मोटर्स लिमिटेडने हंटर 350 सीसी बाईक लॉन्च केली आहे. या बाइकची शोरूम किंमत दीड लाख रुपये आहे. पहिल्यांदा गाडी विकत घेणार खरेदीदार हे कंपनीचे टार्गेट आहे. कंपनीने पुढील काळात भारतीय बाजारात 32 लाख युनिट्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 10 लाख युनिट्स विकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या शेअरला ‘बाय’ (खरेदी) टॅग दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 95,042.27 कोटी रुपये आहे.

कंपनीने दिला भरघोस परतावा :
1 जानेवारी 1999 रोजी आयशर मोटर्सच्या एका शेअरची किंमत फक्त 1.22 रुपये होती. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 284,572.13 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. एवढेच नाही तर ज्याने 1999 साली ह्या शेअर्स मध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते आणि जर ते आतापर्यंत ठेवले असतील, तर त्याना एकूण तब्बल 28.4 कोटी रुपये परतावा मिळाला असेल. आयशर मोटर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 23.81 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे, 2022 या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअरच्या किमतीत तब्बल 27.74 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2022 पर्यंत कंपनीच्या प्रोमोटर्सकडे कंपनीचा एकूण 49.21 टक्के वाटा होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Eicher motors Share price return on 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x