13 May 2025 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | रॉकेट तेजीत डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: MAZDOCK Reliance Power Share Price | 43 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, शॉर्ट टर्ममध्ये मजबूत रिटर्न - NSE: RPOWER Suzlon Share Price | खरेदी करा सुझलॉन स्टॉक, स्वस्तात खरेदीची संधी, मिळेल जरबदस्त परतावा - NSE: SUZLON IRFC Share Price | पीएसयू शेअर फोकसमध्ये, बुलेट ट्रेनच्या गतीने मिळेल रिटर्न, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IRFC Rama Steel Share Price | 11 रुपयाचा पेनी स्टॉक खरेदीला तुफान गर्दी, मोठी संधी, टार्गेट जाणून घ्या - NSE: RAMASTEEL CDSL Share Price | स्टॉक खरेदीला गर्दी, शेअर प्राईसमध्ये 3.17 टक्क्यांची वाढ, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: CDSL Yes Bank Share Price | जबरदस्त फायद्याची टार्गेट प्राईस, पेनी स्टॉक खरेदी करा, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: YESBANK
x

Brahmastra Box Office | ब्रह्मास्त्र चित्रपटाने तोडले KGF 2 आणि War चे रेकॉर्ड, 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार

Brahmastra Collection

Brahmastra Collection | बॉक्स ऑफसवर सध्या ब्रह्मास्त्र आपली छाप सोडत आहे. या चित्रपाटासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट, बॉक्स ऑफसवर चांगली कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाने 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार केला आहे. माध्यमांवर विश्वास ठेवला तर ब्रह्मास्त्र चित्रपटाने KGF Chapter 2 आणि हृतिक रोशन स्टारर वॉरला मागे टाकले आहे. दोन दिवसांच्या कलेक्शन बाबत ब्रह्मास्त्रने नवीन यश संपादन केले म्हणायला हरकत नाही.

बॉक्स ऑफसवर चित्रपटांची शर्यत
कोरोना काळापासून चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच काही दिवसांपासून बॉयकॉटचा ट्रेंड समोर येत आहे. दरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपट खुप महागडा चित्रपट ठरला आहे कारण या चित्रपटाला सुमारे 410 कोटींचा खर्च झाला आहे. या चित्रपटासाठी अयान मुखर्जीयांनी 10 वर्ष मेहनत घेतली आहे. 9 सप्टेंबर रोजी ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज झाला होता आणि त्याच रात्री हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला त्यामुळे निर्मात्यांवर चित्रपटाच्या कमाईबाबत दबाव निर्माण होता. मात्र गेल्या दोन दिवसांत चित्रपटाने 160 कोटींचा आकडा पार केला आणि KGF Chapter 2, आणि वॉरला मागे टाकले.

PVR च्या एका दिवसाच्या कमाईत ब्रह्मास्त्र पुढे
गेल्या दोन दिवसांपासून ब्रह्मास्त्र चित्रपटाने गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. तसेच ब्रह्मास्त्र चित्रपटाने KGF Chapter 2, आणि वॉर PVR च्या एका दिवसाच्या कमाईत मागे टाकले आहे. अहवालानुसार KGF Chapter 2 चित्रपटाने PVR च्या एका दिवसाच्या कमाईत 9.33 कोटी रुपये कमवले होते. तर War’s चित्रपटाने 8.85 कोटी रुपये कमवले होते.

ब्रह्मास्त्रमध्ये किंग खान सर्वांना आवडला
दरम्यान, ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तसेच या चित्रपटाची पहिल्या दिवसाची वर्ल्डवाइड कमाई 75 कोटी रुपये होती. रोज नव्याने या चित्रपटाची कमाई वाढत आहे तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 160 कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटामधील बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा रोल खूप आवडला आहे. तर काहींची त्याला नापसंती सुद्धा आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Brahmastra movie broke the records of KGF2 and WAR Checks details 12 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Brahmastra Collection |(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या