4 May 2025 5:00 PM
अँप डाउनलोड

 Viral Video | भाजपची सत्ता असलेल्या राज्यात गायीच्या शवासोबत क्रूर प्रकार, जेसीबीने फरफटत नेलं, हिंदू संघटनांकडून संताप, व्हिडिओ पहा

Viral Video

 Viral Video | हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते मात्र सध्या एक अशी घटना समोर येत आहे जी संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. माणुसकीला लाजवेल अशी घटना सोशल मीडियावरून समोर आली आहे. गायीच्या शवासोबत क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स प्रचंड संतापले आहेत आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या भावना दुखावण्याचे कामही हा व्हिडिओ करत आहे तसेच क्रूरतेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ व्हायरल :
दरम्यान, ही घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. येथे शहराच्या सीमेवर असलेल्या पेप्टेक सिटी टाऊनशिपजवळील ढाब्याजवळ गायीचा मृत्यू झाला, त्यानंतर ढाब्याच्या मालकाने तेथून मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलावला व गायीचे शव जेसीबीने ओढून ढाब्यावर फेकण्यात आले. गाईवर असे क्रूर कृत्य होत असताना तेथून जाणाऱ्या कार चालकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गायीचे दोन्ही पाय जेसीबीने बांधून ओढले जात असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला :
घडलेला सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला व पोलिस अधीक्षकांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. गुन्हा दाखल करून जेसीबी चालक व ढाबा मालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ढाब्याचे मालक अटल प्रताप सिंह यांनी सांगितले की, गायीच्या शवावर माश्या बसू लागल्या होत्या, त्यामुळे कोणीही मृतदेह टाकण्यास तयार झाले नव्हते. या कारणास्तव जेसीबी मागवावा लागला होता. गायीला अशाप्रकारे रस्त्यावर ओढत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने हिंदू संघटना आणि गोसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेबद्दल सर्वजण खेद व्यक्त करत आहेत तसेच हा व्हायरल व्हिडिओ राकेश कुमार पटेल नावाच्या सत्यापित ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video JCB seen dragging cow dead body video trending on social media checks details 28 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या