15 May 2024 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Stocks To BUY | या शेअरने फक्त 4 महिन्यांत 92 टक्के परतावा दिला, आता ब्रोकरेजकडून नवी टार्गेट प्राईस, स्टॉक नेम नोट करा

IPO Investment

Stocks To BUY | 24 मे 2022 रोजी व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचा IPO शेअर बाजारात लिस्ट झाला होता. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 326 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 4 टक्के प्रीमियम किमतीसह 337.50 रुपये वर लिस्ट झाले होते. तेव्हापासून या स्टॉकमध्ये मागील चार महिन्यांत 92 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. आज BSE निर्देशांकावर व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स कंपनीचा शेअर 628.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या व्यवहारात हा स्टॉक 652 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळीवर पोहोचला होता.

तज्ञांनी दिली नवी लक्ष किंमत :
ब्रोकरेज फर्म या स्टॉकबद्दल अतिशय उत्साही आणि सकारात्मक दिसत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. सेंट्रमने त्याची या शेअरची पुढील लक्ष्य किंमत 764 रुपये निश्चित केली असून त्याला ‘खरेदी करा’ असे रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज आणि संशोधन फर्म सेंट्रमने आपल्या अहवालात म्हटले आहे की, समिश्र EBITDA मार्जिन सध्या रत्नमणी पाईप्स/RMTL पेक्षा सुमारे 1,000 bps नीचांकी पातळीवर आहे. नवीन क्षमतेसह, व्हीनस पाईप्स ही भारतातील दुसरी सर्वात मोठी पाइप उत्पादक कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. तज्ञांनी आल्या अहवालात म्हंटले आहे की, आमचा अंदाज आहे की कंपनीचा EBITDA मर्जिन पुढील काळात 46 टक्के CAGR पेक्षा वर जाईल. तज्ञांनी या स्टॉक ला “BUY” रेटिंग दिले असून पुढील लक्ष किंमत 764 रुपये निर्धारित केली आहे. व्हीनस पाईप्स कंपनीचे शेअर्स सध्या खरेदी करण्यासाठी एकदम योग्य किमतीवर ट्रेड करत आहेत.

व्हीनस कंपनीबद्दल थोडक्यात माहिती :
IPO मधून उभारलेला निधी कंपनी आपले अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. Venus Pipes & Tubes ही गुजरात स्थित कंपनी असून स्टेनलेस स्टील पाईप्स आणि ट्यूब्सचे उत्पादन आणि निर्यात करते. कंपनी मुख्यतः रसायने, अभियांत्रिकी, खते, फार्मास्युटिकल्स, ऊर्जा, अन्न प्रक्रिया, कागद आणि तेल आणि वायू अशा विविध क्षेत्रांमध्ये व्हीनस ब्रँड नावाखाली आपली वस्तू आणि उत्पादनाचे विक्री आणि विपणन करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To BUY call on Venus Pipes & Tubes share price return on investment after IPO got listed in stock market on 08 October 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x