ठाकरे सरकारच्या काळातील भरतीवर शिंदे सरकारचा रोजगार इव्हेन्ट, शिंदेंच्या बंडामुळे नियुक्त्या रखडल्याच सत्य आलं समोर

Shinde Sarkar Rojgar Event | देशभरात बेरोजगारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाला आहे. वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ असं वचन देऊन सत्तेत आलेलं मोदी सरकार मात्र याविषयात पूर्णपणे नापास झालं आहे. त्यात गुजरात निवडणुकीत बेरोजगारी आणि महागाई हे मुद्दे उच्च स्थानी असल्याने मोदी सरकारच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. परिणामी, शिंदे सरकार सत्तेत येताच मोदी सरकारने महाराष्ट्रातील लाखोंचा रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे. परिणामी काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतून एक इव्हेन्ट गुजरात निवडणुकीच्या तोंडावर घडवून आणला होता. त्यात केंद्रातील विविध खात्यातील नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा इव्हेन्ट आयोजित करून आम्ही रोजगार निर्माण करत आहोत असा भास निर्माण करताना २ कोटी रोजगारावरून माध्यमांना विचलित केले. मात्र याच इव्हेन्टसाठी संबंधित उमेदवारांना ६ महिने नियुक्ती पत्रापासून ताटकळत ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली होती.
त्यानंतर असेच इव्हेन्ट करण्याचे आदेश भाजपशासित राज्यांना देण्यात आले आहेत. तोच प्रयोग आज महाराष्ट्रात पाहायला मिळाला. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीप्रमाणे ठाकरे सरकारच्या काळात ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहिरात देण्यात आली होती, तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये या परीक्षा पार पडल्या आणि हे विद्यार्थी यशस्वी झाले होते. मात्र पुढच्या जुन मध्ये शिंदेनी ४० आमदारांसोबत सुरतमार्गे राजकीय पलायन करून सरकार पाडलं आणि त्यात सर्व गोष्टी स्थिर होण्यास अधिक काळ गेला आणि परिणामी या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. मात्र दिल्लीतून आदेश आल्याप्रमाणे ठाकरे सरकारच्या काळातील २००० सरकारी नोकऱ्यांवरून नियुक्तीपत्र देण्याचा इव्हेन्ट करण्यात आल्याचं वृत्त आहे. इव्हेन्टसाठी मोदींना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आणि त्याला कारणही राष्ट्रीय हेडलाईन करण्यात आलं अशी चर्चा पत्रकारांमध्ये सुद्धा रंगली आहे. पण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मोदींप्रमाणे इव्हेन्ट तज्ज्ञ झाले आहेत असं सगळेच गमतीने म्हणतात. कारण घरी किंवा कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी, त्यांच्या बाजूला एक कॅमेरामन आधीच तयार असतो हे वारंवार पाहायला मिळतंय.
राज्य सरकारतर्फे लवकरच 75 हजार तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. याची सुरुवात आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पहिला कार्यक्रम झाला. आज दोन हजार तरुणांना नोकऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना संबोधित केले.
शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील भरती नाही :
फडणवीसांच्या बोलण्यातच या भारतीय विद्यमान सरकारच्या काळातील नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ते म्हणाले, “नोकरी भरतीची ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने झाली पाहिजे, असे प्रयत्न आहेत. त्यामुळे अनेक पदं एमपीएससीला दिलेत. विभागातर्फे ही पदं भरताना एक अमूलाग्र बदल केलाय. मागील सरकारमध्ये जे घोटाळे, यात पहायला मिळाले, तरुणांच्या मनात शंका निर्माण झाली. वर्षभरात 75 हजार परीक्षा आटोपून ही नियुक्ती करायची आहे. 14 ते 19 च्या काळात (तत्कालीन फडणवीस सरकारच्या) ही भरती करायची होती. पण अनेक अडथळे आले. कोर्टकचेरी झाली. अनेकदा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विविध आरक्षण असतात. याचा आधी योग्य प्रकारे विचार झाली नाही तर कोर्ट केस होतात. मुलांना अनेक वर्ष ताटकळत बसावं लागतं असं फडणवीस म्हणाले.
My remarks at Rozgar Mela in Maharashtra. Best wishes to the newly inducted appointees. https://t.co/LZiyKVskUZ
— Narendra Modi (@narendramodi) November 3, 2022
भारतीय स्वातंत्र्याची ७५वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून एका वर्षात ७५हजार युवक,युवतींना रोजगार देण्याच्या उद्देशाने #महासंकल्प या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचा शुभारंभ आज झाला.यावेळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांच्यासोबत पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. pic.twitter.com/KeJqMsGM0f
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 3, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Shinde Sarkar Rojgar Event check details 03 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN