4 May 2025 3:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
x

भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर चीनच्या दुप्पट, आकडा १३६ कोटींवर

India, China, Population

नवी दिल्ली : भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. दरम्यान, २०१० ते २०१९ या दहा वर्षाच्या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२०१९ मध्ये भारताची लोकसंख्या १३६ कोटींवर पोहोचली आहे. तत्पूर्वी १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तसेच १९६९ मध्ये ती ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. मागील वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. संबंधित अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. परंतु, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

१९६९ मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे ४७ वर्ष होते. १९९४ मध्ये साठ वर्ष झाले त्यानंतर २०१९ मध्ये ते ६९ वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर ७२ वर्ष आहे. अहवालात २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची २७-२७ टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे ० ते १४ आणि १०-२४ वर्ष इतके आहे. तर देशाची ६७ टक्के लोकसंख्या १५-६४ या वयोगटातील आहे.

देशाची सहा ६ टक्के लोकसंख्या ६५ वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर १९९४ मध्ये एक लाखांमागे ४८८ इतका होता. त्यात घट होऊन २०१५ मध्ये हा दर प्रती लाख १७४ मृत्यू इतपर्यंत खाली आला. मात्र, युएनएफपीएचे संचालक जेनेवा मोनिका फेरो यांनी ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करताना महिलांचे मृत्यू थांबवण्यासाठी गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या