4 May 2025 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
x

मुरजी पटेल व केसरबेन पटेल यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नगरसेवक पद रद्दच

Kesarben Patel. Murji Patel, Kesarben Patel, BJP

मुंबई : जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण ५ नगरसेवकांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू लागली.

मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव, प्रभाग क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुधा सिंग, प्रभाग क्रमांक ७६ मधील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका केशरबेन पटेल, प्रभाग क्रमांक ८१ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुरजी पटेल, प्रभाग क्रमांक ९० मधील काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने यापूर्वीच फेटाळले होते.

दरम्यान अंधेरी भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांची पत्नी नगरसेविका केसरबेन पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्बत केलं आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वेतील भाजप नैतृत्व जवळपास संपुष्टात आलं आहे आणि आता भाजप येथून नव्या चेहऱ्याचा शोध घेईल असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देखील स्थानिक भाजपकडून प्रचारासाठी सहकार्य मिळत नसल्याने शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेऊन भाजपवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे इथे भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये जुळत नसल्याचं वृत्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या