1 June 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ग्रॅच्युईटी संदर्भात मोठी घोषणा, लाखोंचा फायदा होणार Double Line on Cheque | बँक चेकच्या डाव्या कोपऱ्यातील त्या 2 ओळी, पण अनेकांना त्याबद्दल 'ही' माहितीच नाही LIC Policy Surrender | पगारदारांसाठी गुड-न्यूज! LIC पॉलिसी सरेंडर करून 48 तासांत पैसे मिळणार, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये आणखी तेजी येणार, स्टॉकची किंमत नवीन उच्चांकावर पोहचली, स्टॉकबाबत तज्ञांचे मत

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअर्सने नुकताच 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 514 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते.

शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 513.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवस भराच्या ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्स कंपनीचा स्टॉक 516.75 रुपयेवर पोहचला होता. कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

तिमाही निकाल तपशील :
‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स फॉलो करणाऱ्या ब्रोकरच्या मते, टाटा मोटर्स कंपनी मार्च तिमाहीत 3100 ते 3200 कोटी रुपयांच्या दरम्यान निव्वळ नफा कमावण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स कंपनीला ‘जग्वार लँड रोव्हर’ कंपनीच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तसेच भारतात ही या कंपन्यांसाठी चांगली स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जर कंपनीचे निकाल तज्ज्ञांच्या अंदाजाजवळ आले तर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स जबरदस्त वेगात धावू शकतात.

टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ :
टाटा मोटर्स कंपनीचा संबंध टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या IPO शी देखील आहे. 18 वर्षांनंतर टाटा समूह आपल्या कंपनीचा IPO लाँच करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने 9 मार्च 2023 रोजी IPO साठी सेबीकडे DRHP कागदपत्रे सादर केले आहेत. ही कंपनी IPO द्वारे 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकून भांडवल उभारणी करणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने मोठी गुंतवणुक केली आहे. सध्या टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजीचे 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील 2 महिन्यांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x