14 May 2025 6:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ITR Filing 2025 | नोकरदारांनो, ITR फाइल करताना या चुका टाळा, अन्यथा मोठा त्रास होऊन आर्थिक नुकसान होईल EPFO Money Amount | पगारदारांनो सॅलरीतून EPF कट होत असल्यास खात्यात जमा होणार 1,30,35,058 रुपये, फायद्याची अपडेट CDSL Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने घटवली रेटिंग, शेअरची टार्गेट प्राईस सुद्धा अपडेट केली - NSE: CDSL RVNL Share Price | मल्टीबैगर शेअरमध्ये तेजीचे संकेत, अपसाइड टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RVNL IRFC Share Price | 22 टक्के तेजीचे संकेत, पीएसयू शेअर्सची जोरदार खरेदी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC Yes Bank Share Price | येस बँक शेअर्ससाठी SELL रेटिंग, पेनी स्टॉकबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत - NSE: YESBANK HFCL Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार या स्वस्त शेअरवर, रिलायन्स ग्रुपचीही हिस्सेदारी, टार्गेट नोट करा - NSE: HFCL
x

मोदी भक्त मनोज मुंतशिर बरळला! बजरंगबली हे देव नव्हते, ते केवळ भक्त होते, आपण त्यांना देव बनवले, औरंग्या-औरंग्या करणारे फडणवीसही शांत

Manoj Muntashir

Manoj Muntashir Trolled | प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही. आधी चित्रपटातील दृश्ये आणि संवादांवर टीका होत असताना आता मोदी भक्त मनोज मुंतशिर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला आहे. ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी हनुमानजी देव नसून भक्त असल्याचा दावा केला आहे. मनोज मुंतशिर यांचे हे वक्तव्य समोर आल्यापासून त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे.

असे आहे मनोज मुंतशिर यांचे संपूर्ण विधान

‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासून मनोज मुंतशिर यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी लिहिलेले संवाद, विशेषत: बजरंगबलीचे संवाद लोकांना आवडलेले नाहीत. अशा तऱ्हेने मनोज मुंतशिर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत स्वत:चा बचाव करताना म्हटले की, बजरंगबलीने श्रीरामासारखा संवाद साधला नाही कारण ते देव नाही तर भक्त आहेत. त्याच्या भक्तीत ती शक्ती होती म्हणून आपण त्यांना देव बनवले आहे.

समाज माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया

मनोज मुंतशिर यांच्या या वक्तव्यामुळे लोक अधिकच संतापले आहेत. मनोज मुंतशिर यांना सोशल मीडियावर ट्विट करून मुलाखत न देण्याचा सल्ला देत आहेत. एकाने लिहिले की, “सर्वप्रथम मनोज मुंतशिर यांनी मुलाखती देणे थांबवावे. दुसरी नेटीझनने म्हटले, “स्वत:ची तपासणी करून घ्या.” तिसऱ्याने लिहिले की, हनुमान जी भगवान शिवाचे अवतार होते, या मूर्ख व्यक्तीला माहिती नाही आणि तो रामायणाचे संवाद लिहितो आहे. चौथ्या युजरने म्हटले की, कृपया या मुर्खाला कोणी तरी शांत करा.

विशेष म्हणजे भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान मोदी यांनी या सिनेमासाठी प्रसिद्धी दिली होती. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते. आता फडणवीसांना यावर प्रतिप्रश्न करून यावर महाराष्ट्र प्रदेश भाजप आंदोलन किंवा मोर्चा काढणार का असे विचारल्यास ते अडचणीत सापडतील. कारण मनोज मुंतशिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोणत्याही अपॉइंटमेंट शिवाय भेट मिळते.

News Title : Manoj Muntashir on radar of Social media for his claim that lord Hanuman was not god check details on 20 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manoj Muntashir(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या