17 June 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! सोन्याचा भाव विचारू नका, 1 तोळा होणार 1 लाख रुपयांच्या पार, महत्वाची अपडेट आली Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, छोटी बचत बघता-बघता 12 लाख रुपये परतावा देईल Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट
x

Cyient DLM IPO | सायंट DLM IPO शेअर लास्टिंग होतोय, कमाईसाठी शेअरची ग्रे मार्केट कामगिरी जाणून घ्या

Cyient DLM IPO

Cyient DLM IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर सायंट DLM कंपनीच्या IPO मध्ये नक्की गुंतवणूक करा. लवकरच या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सायंट DLM या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून देऊ शकतात.

सायंट DLM कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 265 रुपये म्हणजेच IPO किमत बँडच्या तुलनेत 45 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. सायंट DLM कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांकडून IPO ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, स्टॉक मार्केटमधील सकारात्मक भावना आणि कंपनीच्या वाढीची चांगली शक्यता विचारात घेता IPO स्टॉक प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

एखाद्या कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध होण्याआधी ग्रे मार्केट खरेदी विक्री केले जातात. ग्रे मार्केट एक अनौपचारिक बाजार आहे. ग्रे मार्केट किंमत साधारणपणे गुंतवणूकदारांना लिस्टिंग किंमतीचा अंदाज लावण्यास मदत करतो. Cyient DLM कंपनीने आपल्या IPO 27 ते 30 जून 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला होता. हा IPO एकूण 67.31 पट सबस्क्राईब झाला होता. गुंतवणूकदारांनी सायंट DLM कंपनीच्या IPO ला अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 90.44 पट सबस्क्राईब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 49.22 पट सबस्क्राईब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 45.05 पट सबस्क्राईब झाला होता.

अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ज्ञांच्या मते सायंट DLM कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किमतीवर किमतीवर ट्रेड करत आहेत. गुंतवणूकदारांच्या मोठ्या प्रतिसादामुळे आणि बाजारातील तेजीमुळे सायंट DLM स्टॉक चांगल्या किमतीवर सूचीबद्ध होण्यास सज्ज आहे. आयपीओ मार्केटमधील उलाढाल आणि अर्थव्यवस्थेतील तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. QIB गुंतवणूकदारांचा IPO मधील वाढलेला सहभाग हे देखील ग्रे मार्केट प्रीमियम किमतीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असू शकते. यावरून IPO मधील संस्थात्मक गुंतवणूकदारांचा विश्वास आणि उत्साह पाहायला मिळतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient DLM IPO GMP Today check details on 08 July 2023.

हॅशटॅग्स

Cyient DLM IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x