18 June 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार, 1 महिन्यात दिला 41% परतावा, आली फायद्याची अपडेट Hot Stocks | खरेदी करा हे 3 शेअर्स, 85 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये मल्टिबॅगर परतावा मिळेल IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 177% परतावा, संधी सोडू नका Wipro Share Price | विप्रो सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, झटपट मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग BEL Share Price | BEL शेअर ब्रेकआऊट देणार, टेक्निकल चार्टवर सकारात्मक संकेत, मोठा परतावा देणार Post Office Scheme | फायदाच फायदा! फक्त व्याजातून कमवाल 4.5 लाख रुपये, पोस्ट ऑफिसची खास योजना
x

Indian Bank Share Price | सरकारी बँक FD वर किती व्याज देते? या सरकारी बँकेच्या शेअरने 3 वर्षात 549% परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या

Indian Bank Share Price

Indian Bank Share Price | नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिमाही बँकिंग अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारतातील बँकांची स्थिती उत्तम आहे. अनेक गुंतवणुकदार आता एफडी मध्ये गुंतवणूक न करता बँकिंग स्टॉकमध्ये पैसे लावून भरघोस नफा कमवत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका बँकिंग स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, जो तुमचे पैसे अवघ्या तीन वर्षात 5 पट अधिक वाढवू शकतो.

या बँकिंग स्टॉकचे नाव आहे, इंडियन बँक लिमिटेड. मागील 3 वर्षांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 549 टक्के नफा मिळवून दिला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये या बँकेचे शेअर्स 58.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन बँक स्टॉक 2.94 टक्के वाढीसह 391.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

3 वर्षात एक लाखाचे झाले 6.49 लाख :

जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी इंडियन बँक स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.49 लाख रुपये झाले असते. 8 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन बँकेचे शेअर्स 408 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 171.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचला होता. 8 ऑगस्ट 2023 रोजी इंडियन बँक स्टॉक 394.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

गुंतवणूकीवर परतावा :

मागील एका वर्षात इंडियन बँक स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. तर मागील 5 दिवसांत या बँकिंग स्टॉकने लोकांना 11.71 टक्के परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात इंडियन बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23.04 टक्के परतावा कमवून दिला आहे.

मागील एका वर्षात इंडियन बँक स्टॉकने लोकांचे पैसे 115.12 टक्के वाढवले आहेत. YTD आधारे या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 ऑगस्ट 2022 रोजी या बँकेचे शेअर्स 175 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 390 रुपयेच्या पार गेला आहे.

बँकेची कमाई :

27 जुलै 2023 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने जून 2023 ला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार जून तिमाहीत इंडियन बँकेने 41 टक्क्यांच्या वाढीसह 1,709 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत या बँकेने 1,213 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 26 टक्क्यांच्या वाढीसह 5,703 कोटी रुपयेवर पोहचले आहे. जे मागील वर्षी याच तिमाहीत 4,534 कोटी रुपये होते. ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने इंडियन बँक स्टॉकवर 450 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Bank Share Price today on 11 August 2023.

हॅशटॅग्स

#Indian Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x