4 May 2025 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

आठवलेंना पुन्हा मंत्रिपदाची शपथ; मागील ५ वर्ष त्यांनी काय विकास कामं केली ते रहस्य

Narendra Modi, Amit Shah, Ramdas Athavale

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ६५ मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये आधीच्या २१ मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून २० तरी नवीन चेहरे असण्याची शक्यता आहे. मात्र, रामदास आठवले मंत्रिपदासाठी शहांच्या फोनची वाट पाहत होते. अखेर आठवलेंना शहांचा फोन आला असून अद्याप मंत्रीपदाबाबत माहिती समोर आलेली नाही. याआधी देखील त्यांना मंत्रिपद भेटलं असलं तरी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी नेमकी कोणती विकास कामं केली हा मुळात संशोधनाचा विषय आहे. मागील ५ वर्ष ते प्रसार माध्यमांना केवळ फुटकळ प्रतिक्रिया देणं आणि संसदेत किंवा संसदेच्या बाहेर श्रोत्यांना मनावर दगड ठेवून ऐकाव्या लागणाऱ्या शेरोशायऱ्या दिल्याचे मतदाराला ज्ञात आहे. त्यामुळे पुढील ५ वर्ष देखील ते वेगळं काही करणार नाहीत अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

रामदास आठवलेंना मंत्रीपद मिळणार या आशेने सकाळपासून हार-तुरे घेऊन कार्यकर्ते जल्लोषाच्या तयारीत होते. मात्र, आठवलेंना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा फोन न आल्याने या आशेवर विरजण पडल्याचे जाणवत होते. अखेर आठवलेंना शहा यांनी फोन केल्याचे समजत आहे. आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ४.३० वाजता भेट घेणार आहेत. याचवेळी मोदींच्या मंत्रीमंडळातील समाविष्ट होणारे खासदारही मोदींची भेट घेणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या