2 May 2025 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

यापुढे मोदी सरकारमध्ये सामील होणार नाही, नितीश कुमारांचा बिहारी बाणा

Nitish Kumar, Narendra Modi

नवी दिल्लीः केंद्रात बहुमताने मोदी सरकार स्थापन झाल्याने घटक पक्षांना त्रास होण्यास आणि त्यांना गृहीत धरण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी शिवसेना आणि जेडीयूने मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून नाराजी व्यक्त केली होती. त्यात शिवसेनेने मिळेल ते पदरात पाडून घेणं रास्त समजल्याने आणि राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मूग गिळून गप्प बसणे पसंत केल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे बिहारमध्ये मात्र नितीश कुमार यांनी उघड नाराजी व्यक्त करत, स्वतःचा बिहारी बाणा दाखवण्यास सुरुवात केली आहे.

जनता दल संयुक्त (जेडीयू)नं मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. तसेच भविष्यात देखील जेडीयू केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी प्रसार माध्यमांकडे स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यादरम्यान नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. त्यांनी मोदी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नितीश कुमार म्हणाले की, अमित शाह यांनी बोलावल्यानंतर मी दिल्लीत दाखल झालो. त्यानंतर त्यांनी एनडीएच्या घटकपक्षांना एक-एक मंत्रिपद देत असल्याचं सांगितलं. त्यावर मी म्हणालो, मंत्रिमंडळात नाममात्र प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही. त्यानंतर जेडीयूच्या सर्वच खासदारांनी यावर सहमती दर्शवली आहे. नितीश कुमार हे मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी न झाल्यानं बिहारमधल्या राजकीय परिस्थितीसंदर्भात नव्याच चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जेडीयूनंही बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तीव्र केली आहे.

काश्मीरमध्ये संविधानाचं कलम ३७० हटवणं, अयोध्येतील राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक आणि समान नागरी कायदा या सर्वच मुद्द्यांवर जेडीयूचं भारतीय जनता पक्षापेक्षा वेगळं मत आहे. मोदी कॅबिनेटमध्ये जेडीयूनं सहभागी न होणं आणि बिहारमधल्या नितीश कॅबिनेटमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही मंत्रिपद देण्यात न आल्यानं आता भाजपा-जेडीयूतली धुसफूस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूला सहभागी करून न घेतल्यानं आम्ही नाराज किंवा असंतुष्ट असल्याची चर्चा निरर्थक असल्याचंही त्यागी म्हणाले आहेत.

जदयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून आधीच मंत्री बनविण्यात आले आहेत. जी खाती रिकामी आहेत ती जदयूची आहेत, असे स्पष्टीकरण जदयूने दिले आहे. मात्र, केंद्रीय मंत्रिपद आणि मोदी सरकारमध्ये जदयू सहभागी न झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. बिहार कॅबिनेट विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या