2 June 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ग्रॅच्युईटी संदर्भात मोठी घोषणा, लाखोंचा फायदा होणार Double Line on Cheque | बँक चेकच्या डाव्या कोपऱ्यातील त्या 2 ओळी, पण अनेकांना त्याबद्दल 'ही' माहितीच नाही LIC Policy Surrender | पगारदारांसाठी गुड-न्यूज! LIC पॉलिसी सरेंडर करून 48 तासांत पैसे मिळणार, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 02 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Senior Citizen Saving Scheme | सरकारी बँकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास FD, मिळेल मजबूत व्याजदर आणि परतावा
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स आजही वेगात, अल्पावधीत गुंतवणुकदारांची मजबूत कमाई होतेय, नवीन अपडेट्स काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. कंपनीच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेले 97.1 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स रिडीम केले आहेत. Suzlon Energy Share Price

हे शेअर्स कंपनीने एसबीआयसीएपी ट्रस्टी लिमिटेड कंपनीकडे तारण ठेवले होते. कंपनीच्या एकूण शेअर होल्डिंगपैकी कंपनीने 7.1 टक्के रिडीम केले आहेत. आज गुरूवार दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.49 टक्के वाढीसह 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीने 28 सप्टेंबर 2023 रोजी तारण ठेवलेले शेअर्स रिडीम केले आहे. अशी बातमी येताच गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात दिलीप सिंघवी अँड असोसिएट्सने सुझलॉन एनर्जी कंपनीसोबतचा शेअर होल्डिंग करार संपुष्टात आणण्याचा निर्णय जाहीर केला होता.

त्यानंतर सुझलॉन एनर्जी कंपनीने, निवेदन जाहीर करून उत्तर दिले की, हा करार संपुष्टात आल्याने कंपनीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. या अपडेटनंतर गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. जून 2023 तिमाहीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार दिलीप सिंघवी आणि त्यांच्या कुटुंबाने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 7.4 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवांच्या नवीन उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. आज या कंपनीचे शेअर्स 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या 2015 नंतरच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 05 October 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(148)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x