29 April 2024 2:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
x

खेकड्यांमुळे धरण कसे फूटू शकते? विद्यार्थ्याचा आदित्य ठाकरेंना सवाल

Aditya Thackeray, Shivsena

सोलापूर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आज सोलापुरातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. यावेळी वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘युवासेनाप्रमुख म्हणून तुमचे प्रश्न पुढे नेण्यासाठी मला ते ऐकणे गरजेचे आहे म्हणूनच मी युवा संवाद हा कार्यक्रम घेतला आहे, असे म्हणत, १८ ते १९ वर्षाच्या वयात मनात जे प्रश्न आहेत ते विचारायला विद्यार्थी घाबरत नाहीत’, याचे आदित्य ठाकरेंनी कौतुक केले.

यावेळी खेकड्यांमुळे धरण कसे फूटू शकते? असा फिरकी घेणारा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. यावर आदित्य यांनी धरण पोखरण्याला आणि फुटण्याला खेकडे कसे कारणीभूत ठरतात हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच खेकड्यांमुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे धरण फुटले आहे याचा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील इतर धरणे व्यवस्थित राहतील आणि ज्याठिकाणी धरणे नाही आहेत तिथे धरणे कशी बांधता येतील याचा सध्या विचार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी मंत्री तानाजी सावंत हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.

चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्यामुळे २० पेक्षा अधिक जणांना दुर्दैवाने जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संबधित घटना खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यांनतर त्यांच्यावर सर्वबाजूने जोरदार टीका झाली होती. विरोधकांनी सावंत यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत त्यांच्या निवासस्थानी खेकडे सोडले होते. सदर घटना जरी चिपळूण येथील तिवरे धरणाच्या फुटाण्यासंबंधित असली तरी राज्यातील अनेक धरणाची अवस्था ही अत्यंत भयानक आहे. दरम्यान जलसंपदा खात्याकडे स्थानिक अनेक तक्रारी देखील देत असतात.

राज्याच्या जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंत्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील धरणांना खेकड्यांपासून धोका आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच मातीच्या धरणांनाच खेकड्यांपासून धोका असतो, अशी चर्चा आहे. परंतु एका संशोधनात सर्वच प्रकारच्या धरणांना खेकड्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे. खेकडे मातीत बीळ करू शकतात, त्याच ताकदीने मुरुमही पोखरू शकतात अशी माहिती आहे.

दरम्यान, जलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या धरणांची चौकशी होणार आहे. तसेच ज्या धरणांना धोका आहे त्या धरणांची डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या संकटांपासून नागरिकांची सुरक्षा होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीपेक्षा सरकार खेकड्यांच्या अहवालावर नेमका कशा संबंधित टेंडर निवडणुकीच्या तोंडावर काढेल ते सांगता येणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x