3 May 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? उद्धव ठाकरेंचा सवाल

Sanjay Dutt, Shivsena, Uddhav Thackeray, Minister Mahadev Jankar

मुंबई : संजय दत्त जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच. जानकर असेही म्हणाले की, त्यांचा पक्ष कमळ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली 5 वर्षे त्यांच्या पक्षाचा भुंगा हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे. मात्र तरीही जानकर बोलले आता हा देखील सौम्य विनोद आहे असे कोणी समजू नये असा टोला शिवसेनेने महादेव जानकारांना लगावला आहे.

२०१४ साली बारामतीत झालेल्या आंदोलनापासून अलीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी नगर जिल्ह्यातील ‘ चौंढी ‘ येथे धनगर तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाग घेतलेल्या असंख्य तरुणांवर गुन्हे आणि खटले दाखल झाले. यात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता, पण शब्द देऊनही धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. मुळात धनगर समाजाची आरक्षणाची पूर्ण न झालेली मागणी हा त्या समाजासाठी ज्वलंत विषय आहे. हे आरक्षण देण्याचे आश्वासनदेखील हवेतच विरले आहे.

सरकारने धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या अनेक योजना आजही कागदावरच आहेत. या समाजासाठी मेंढी पालनासाठी जागा, वसतिगृहे, घरे, नोकऱ्या, चरई अनुदान वगैरैंच्या केवळ घोषण झाल्या आहेत. धनगर तरुणांवर विविध आंदोलनांमध्ये दाखल झालेले गुन्हे कधी मागे घेतले जाणार? हे प्रश्नांचा पाठपुरावा करण्याऐवजी जानकर सिनेमावाल्यांना पक्षात घेत आहेत. सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या