3 May 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

'मंदि'र ते मंदी', बघ माझी आठवण येते का? सविस्तर

Narendra Modi, Manmohan Singh

नवी दिल्ली : दशक भरापूर्वी म्हणजे २००८ नंतर आता पुन्हा एकदा आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. २०१९ मध्ये जागतिक मंदी येणार असल्याचे भाकित अमेरिकेत वर्तवलं आहे. मॅरेथॉन अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे मालक ब्रुस रिचर्ड्स यांनी ही शक्यता वर्तवली आहे. २०१८ च्या मध्यंतरापर्यंत यावर ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅमस्टरडॅममध्ये ‘लेजेण्स्ड फोर लेजेण्स्ड’ कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. मात्र आधीच नोटबंदीचे झटके झेलणारी अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या कचाट्यात सापडणार आहे.

ब्रुस रिचर्ड्स म्हणाले की, जागतिक मंदीमध्ये अमेरिकेची काय स्थिती असणार? आर्थिक स्थिती कुमकुवत होणार का? यावर आताच भाष्य करणे योग्य नाही पण पुढे ठाकलेल्या या समस्याला सामोर जाण्याची तयारी सुरु करावी. २०१८ च्या सुरुवातीला किंवा कदाचित २०१९ मध्ये जागतिक मंदी येऊ शकते. क्रेडिट हेज-फंड फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी संधीचा लाभ घेण्यासाठी नवीन संकटग्रस्त निधीची योजना आखत आहेत. जागतिक मंदी मात करण्यासाठी जून २०१८ पर्यंत भांडवल उभे करू शकतात.

२००८ मध्ये संपूर्ण जगात आर्थिक मंदी आली होती, तेव्हाच मुंबईत २६/११ची घटना घडली होती. त्यावेळी काही दिवस पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले होते आणि गृहमंत्रीपद पी. चिदम्बरम यांना देण्यात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी स्टीमुलस पॅकेज आणण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून जागतिक मंदीचा सर्वसामान्यांवर परिणाम होऊ नये. त्यावेळी मनमोहन सिंग यांनी २९,१०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातून अनेक प्रकारची करकपात आणि टॅरिफ देण्यात आले होते. अनेक क्षेत्रांत करकपात करण्यात आली होती, त्यामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक मंदीचा परिणाम झाला नव्हता आणि भारतीय अर्थव्यवस्थेची गतीही कमी झाली नाही.

दरम्यान, आगामी वर्षभरात आठ वर्षांतील सर्वांत मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. जगभरातील एक तृतीयांश फंड मॅनेजरनी या शक्यतेला दुजोरा दिल्याचे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने म्हटले आहे. मेरिल लिंचच्या मते ३४ टक्के फंड मॅनेजरनी वर्षभरात मोठ्या प्रमाणात मंदी येण्याचे भाकित वर्तवले आहे. तसे झाल्यास हा ऑक्टोबर २०११नंतरचा सर्वांत कठीण काळ ठरणार आहे. बँकेतर्फे २ ते ८ ऑगस्टदरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.

अमेरिका-चीन या देशांदरम्यान सध्या सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा उल्लेख करत जगातल्या एका आघाडीच्या आंतरराष्ट्रीय बँकेने ही मंदी म्हणजे जागतिक स्तरावर अनेकांसाठी जोखीम असेल, असे नमूद केले आहे. दरम्यान, अमेरिकेत पुढीन दोन वर्षांत मंदीसदृश स्थिती निर्माण होण्याचा धोका ‘नॅशनल असोसिएशन फॉर बिझनेस इकॉनॉमिस्ट’ च्या पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x