5 May 2025 9:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

विधानसभा निवडणूक: मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन

PM Narendra Modi, CM Devendra Fadavis, Metro Train, Bullet Train

मुंबई : महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी तीन नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन तसेच पहिल्या कोचचे आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ असे मेट्रोचे तीन नवे मार्ग मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ालाही कवेत घेणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या तीन नवीन मेट्रो मार्गाना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ कि.मी.ची वाढ होईल.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा असून, मेट्रोच्या तीन नवीन मार्गांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांना मुंबई शहर व उपनगरात येजा करण्यासाठी प्रभावी वाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबादच्या भेटीतही त्या भागातील प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदी हे भाष्य करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५४ मीटर उंच ३२ मजल्यांच्या या इमारतीमधून मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये भविष्यात निर्माण होणाºया ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बीकेसीमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत बनवण्यात आलेला पहिला मेट्रो कोच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. हा अत्याधुनिक कोच बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे ३६५ दिवस लागतात. मात्र हा कोच केवळ ७५ दिवसांमध्ये बनवण्यात आला. प्राधिकरणाने अशा प्रकारचे पाचशेपेक्षा जास्त कोच दहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो-७ मार्गिकांच्या प्रवाशांसाठी मागविले आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या