4 May 2025 4:57 PM
अँप डाउनलोड

मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Former MP Raju Shetty, Mumbai Police, Mantralay, Farmers Protest

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी अजून सत्तास्थापन झालेली नसली तरी इतर पक्ष मात्र दैनंदिन पक्षीय भूमिकेकडे केंद्रित झाले आहेत. त्यालाच अनुसरून राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नव्या आंदोलनात उतरले आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.

आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसेप) या व्यापार विषयक करारावर आज (४ नोव्हेंबर) सह्या करण्यात येणार आहेत. भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

परंतु, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहेत. कारण दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raju Shetty(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या