1 May 2025 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

खळबळ! भाजपाला पक्षनिधी देणाऱ्या कंपनीचे दहशतवाद्यांशी कनेक्शन: द-वायर वृत्त

BJP Funding, BJP Party Fund, Election Commission of India

मुंबई: आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सकडून भारतीय जनता पक्षाला मोठी रक्कम दान म्हणजे पार्टी फंड म्हणून मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे इक्बाल मिर्ची या अंडरवल्ड’मधील कुप्रसिद्ध व्यक्तीबरोबर व्यावसायिक संबंध असल्याच्या संशयावरून हीच कंपनी ईडी’च्या चौकशी फेऱ्यात असल्याचं वृत्त ‘द-वायर’ने प्रसिद्ध केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबध असणारा इक्बाल मिर्ची उर्फ ​​इक्बाल मेमन हा १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.

‘द वायर’च्या वृत्तानुसार, आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स लिमिटेडने २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षाला १० कोटी रुपयांचा पार्टी फंड अर्थात पक्षनिधी दिल्याचं देखील म्हटलं आहे. विशेष म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब समोर आली आहे. तसेच त्याच कार्यकाळात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक आर्थिक मदत (पार्टी फंड) याच विवादित RKW बिल्डर्स’ने दिली आहे. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकतीच भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरीची कारवाई सुरु केलेल्या DHFL या कंपनीसोबत देखील RKW बिल्डर्स’चे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.

ईडीने RKW बिल्डर्स’चे माजी संचालक रणजीत बिंद्रा यांना इक्बाल मिर्ची आणि इतर कंपन्यांदरम्यान व्यवहारांदरम्यान मध्यस्ती केल्याच्या आरोपावरून अटक देखील केलं आहे. त्यानंतर ‘सनब्लिंक रिअल इस्टेट’ नावाच्या कंपनीने देखील भारतीय जनता पक्षाला २ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे ‘द-वायर’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे या कंपनीवर देखील इक्बाल मिर्ची’कडून प्रॉपर्टी खरेदी केल्याच्या आरोपामुळे ईडीच्या रडारवर आहे.

त्यानंतर स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी ज्याचे संचालक मेहुल अनिल बाविशी यांचे सनब्लिंकशीही घनिष्ट संबंध असल्याचं समोर आलं आहे. याच स्किल रियाल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड भाजपाला २ कोटी पार्टी फंड दिल्याचं निवडणूक आयोगाला दिल्या गेलेल्या माहितीत म्हटलं आहे. त्यानंतर दर्शन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीने भाजपाला २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ७ कोटी ५० लक्ष पार्टी फंड दिल्याचं म्हटलं आहे आणि याच कंपनीचे संचालक प्लॅसिड जेकब नॉरोन्हा यांचे RKW बिल्डर्स’सोबत घनिष्ट संबंध असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी ईडीने इक्बाल मिर्ची प्रकरणात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण कोणताही गैरव्यवहार केलं नसल्याचं म्हटलं होतं. तसेच याच प्रकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उल्लेख देखील केला होता. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांच्यामागे ससेमिरा लागल्याचं म्हटलं जाऊ लागलं. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अंडरवर्ल्ड’मधील लोकांसोबत व्यवसाय करणे हे देशद्रोहापेक्षा कमी नसल्याचं विधान केलं होतं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजवाला यांनी ट्विटरवर भाजपाला चांगलेच कात्रीत पकडल्याचे दिसत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या