3 May 2025 7:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

महाविकास आघाडीमुळे फडणवीस राज्यात पुन्हा येणार नसल्याने केंद्रात घेण्याची तयारी; थेट मंत्रीपदी

Former CM Devendra Fadnavis, Union Cabinet Ministry

नवी दिल्ली: महाराष्ट्रामध्ये यशाच्या दरवाज्यातून परतलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये एका मोठ्या संभाव्य बदलाची चाहूल लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कदाचित केंद्रामध्ये एक मोठी जबाबदारी घेऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात ३० वर्ष जुना मित्रपक्ष म्हणजे शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सरकार स्थापन करताना पाहण्याची नामुष्की सुद्धा भारतीय जनता पक्षावर ओढवली. त्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाने २०२४ मध्ये शिवसेना युपीएच्या गोटात किंवा पवारसोबत तिसरी आघाडी उघडून वेगळीच रणनीती आखू शकतात अशी शंका भारतीय जनता पक्षालाच असल्याचं समजतं.

देवेंद्र फडणवीसांचा समावेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात होऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या असल्या तरीही या वरिष्ठ भाजप नेत्याच्या म्हणण्यानुसार फडणवीस हे कदाचित पक्ष संघटनेमध्ये एक मोक्याची जबाबदारी घेतील. त्यानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षामध्ये मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता आहे.

राज्यात सर्वाधिक १०५ जागा जिंकून देखील भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेरच राहिल्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची राज्यात कोंडी झाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. सत्तास्थापनेच्या गोंधळामध्ये शिवसेनेकडून सातत्याने टार्गेट केले गेलेले देवेंद्र फडणवीस यांना आधीपासून असलेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता यांच्यासारखे पक्षांतर्गत विरोधक देखील आता त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील आहेत. राज्यात शिवसेनेच्या मदतीने आता सरकार स्थापन करणे शक्य नसल्याने फडणवीस यांचा केंद्रात उपयोग करून घ्यावा, असे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींचे मत आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात नेण्याचा विचार केंद्रीय भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या ७ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्याजागी राज्यातून कुणाला पाठवायचं, याची खलबतं सर्वपक्षीय पातळीवर होऊ लागली आहेत. या सातपैकी भारतीय जनता पक्षाकडून ३ जण विजयी होतील अशी गणितं जुळून आली आहेत.

दरम्यान, राज्यसभेवरील सात जागांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीचे ४ तर भाजपचे ३ जण सहजपणे विजयी होतील, असे दिसते. दोन जागा मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, त्यासाठी शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत. काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल. निवडून येणाऱ्या ७ जणांमध्ये शरद पवार हे निश्चितच असतील. दुसऱ्या जागेसाठी यशस्वी प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीचे माजिद मेमन यांना उमेदवारी मिळू शकेल.

 

Web Title:  Former CM Devendra Fadnavis will be soon in National Politics of BJP with cabinet ministry.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या