4 May 2025 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

कोविड उत्सव २०२०, साऊंड चेक-लाईट चेक, R U रेडी मित्रो?...मोदींची खिल्ली उडवली

Corona Crisis, Covid19, Shobhaa De

मुंबई, ५ एप्रिल: देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात गेल्या १२ तासांमध्ये ३०२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. एका बाजूला अशी गंभीर परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले होते की, कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. ५ एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता आपल्याला ९ मिनिटं मला हवी आहेत. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल, असं मोदी म्हणाले होते.

मात्र यावरून मोदींवर विविध स्थरातून टीका होताना दिसत आहे. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी देखील मोदींवर खोचक टीका करताना याच विषयाला अनुसरून एक ट्विट केला आहे आणि त्यातील शेअर केलेल्या फोटोवर म्हटलं आहे, “२२ मार्च साउंड चेक, ५ एप्रिल लाईट चेक, आर यु रेडी मित्रो? कोविड फेस्टिवल २०२०”. यावर नेटिझन्सच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

News English Summary: But from this, Modi has been getting criticism from various levels. Well-known author Shobha Day has also tweeted a tweet following the same topic while criticizing Modi and said in the shared photo, “March 22 Sound Check, April 5 Light Check, Are You Ready Friends? Covid Festival 2020”. Netizens are responding to this.

 

News English Title: Story Shobhaa De criticized PM Narendra Modi over task given during corona crisis situation News Latest Updates .

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या