3 May 2025 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

कोरोना आपत्तीत दहशतवादी जैविक हल्ल्याच्या तयारीत; संयुक्त राष्ट्र संघटनेचा इशारा

Covid19, Corona Crisis, biological terrorist attack

न्यूयॉर्क, १० एप्रिल : करोनामुळे जगभरात आतापर्यंत ८८ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून १९२ देशांमधील १५ लाख १९ हजार २६० जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख १२ हजार १०० जण उपचारांनंतर बरे झाले आहेत. युरोपमध्ये सात लाख ८७ हजार ७४४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत ६२ हजार ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे कोरोना विषाणूच्या जागतिक संकटावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी कोरोना किती धोकादायक आहे, ही पिढ्यांची लढाई आहे आणि संयुक्त राष्ट्राला या कठीण काळात सामोरे जावे लागले, असेही सदस्यांना सांगितले.

या बैठकीत अँटोनियो गुटेरेस यांनी दहशतवादी कोरोनाचा फायदा घेऊ शकतात, असा इशाराही दिला. गुटेरेस यांनी, “दहशतवादी संघटना दहशत पसरविण्यासाठी हल्ले करू शकतात. कारण सर्व देश सध्या कोरोना या साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून जगातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. आपल्याला एकत्र सामोरे जावे लागेल. यासाठी सज्ज व्हा”, असे आवाहन केले.

‘जैविक हल्ल्यामुळे हिंसाचार वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या साथीविरोधात लढण्यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना धक्का बसू शकतो. या कठीण परिस्थितीतही आरोग्य सुविधा पोहोचवण्यामध्ये सुरू असलेला भेदभाव, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी अशा बाबीही आपण पाहत आहोत. तसेच कोरोना विषाणूमुळे स्थलांतरित आणि वंचितांसमोर मानवाधिकारांचे संकट उभे राहू शकते,’ अशी भीतीही गुटोरेस यांनी व्यक्त केली.

 

News English Summary: At the meeting, Antonio Guterres also warned that terrorists could take advantage of Corona. Guterres said, “Terrorist organizations can carry out attacks to spread terror. Because all countries are currently trying to cope with the disease of Corona, it cannot be ruled out. Come on in. Get ready for this, “he appealed.

News English Title: Story Corona virus terrorist prepare major biological terrorist attack taking advantage of corona virus crisis Covid19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या